मालेगावमध्ये भाजपचं 'मुस्लिम कार्ड'फेल, काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष

मालेगाव सारख्या मुस्लिमबहुल भागातही भाजपने पुन्हा मुस्लिम कार्ड टाकलं. पण, मतदारराजाने साफ धुडकावून लावलं. काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 26, 2017 03:01 PM IST

मालेगावमध्ये भाजपचं 'मुस्लिम कार्ड'फेल, काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष

26 मे : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत मुस्लिमबहुल भागात  विजय मिळवल्यानंतर मालेगाव सारख्या मुस्लिमबहुल भागातही भाजपने पुन्हा मुस्लिम कार्ड टाकलं. पण, मतदारराजाने साफ धुडकावून लावत चौथ्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या भाजप सरकारला ताळ्यावर आणलं. मालेगावमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, कुणाच्याही हाती एकहाती सत्ता न मिळाल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीये.

मालेगाव महापालिकेच्या 84 जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर 83 जागांवर कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशी तिहेरी लढत पाहण्यास मिळाली. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर काँग्रेसने आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम ठेवली. काँग्रेसने सर्वाधिक 28 जागा पटकावल्या आहे. 28 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर राष्ट्रवादीने 20 जागा जिंकत दुसरे स्थान मिळवले. शिवसेनेनं 13 जागा जिंकत तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर भाजप चौथ्या स्थानावर फेकलं गेलं. भाजपला 9 जागा मिळाल्यात. तर एमआयएमला 7 जागांवर समाधान मानावं लागलं.

विशेष म्हणजे हिंदूत्वाचा अजेंडा राबवणाऱ्या भाजपने मुस्लिमबहुल भागात उमेदवारांना तिकिटांचं वाटप केलं होतं. एकूण 27 मुस्लिम उमेदवारांनी तिकिटांचं वाटप केलं होतं. यात 16 महिलांचा समावेश होता. परंतु, भाजपने खेळलेलं मुस्लिम कार्ड सपेशल अपयशी ठरलं. मतदारराजाने भाजपची रणनीती उधळवून लावली. विशेष म्हणजे भाजपने 56 उमेदवार दिले होते. त्यापैकी फक्त 9 उमेदवार विजयी झाले. तर काँग्रेसने सर्वाधिक 76 उमेदवार दिले होते. एमआयएमने यावेळी मालेगाव निवडणुकीत उडी घेत 35 उमेदवार दिले होते. मात्र, त्यापैकी फक्त 7 चं उमेदवार विजयी झाले.

मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या पारड्यात फक्त 3 जागा आणखी मिळाल्यात. तर राष्ट्रवादीच्या 2 जागा घटल्या अशून 22 वरून 20 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने मागील निवडणुकीत भोपळाही फोडला नव्हता. मात्र यावेळी 9 जागा जिंकल्यात. तर मागील निवडणुकीत 2 जागा जिंकणाऱ्या मनसेला यंदा भोपळाही फोडता आला नाही.

हिंदुत्त्व आणि मुस्लिम कार्ड खेळणाऱ्या राजकीय पक्षांना एकहाती सत्ता न देत मतदारराजाने सत्तेसाठी या पक्षांच्या पायात पाय अडकवून दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2017 03:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...