Malegaon bomb blast: मुंबई हायकोर्टाने दिला चार आरोपींना जामीन

2008 मध्ये मालेगाव (जि.नाशिक) शहरात झालेल्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात मुंबई हायकोर्टाने चार आरोपींना 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 12:07 PM IST

Malegaon bomb blast: मुंबई हायकोर्टाने दिला चार आरोपींना जामीन

मुंबई, 14 जून- 2008 मध्ये मालेगाव (जि.नाशिक) शहरात झालेल्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात मुंबई हायकोर्टाने चार आरोपींना 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. लोकेश शर्मा, धान सिंह, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नारवारिया अशी जामीन मिळालेल्या आरोपींची नावे आहेत.

मालेगाव प्रकरणात सुरुवातीला एटीएसने 9 मुस्लिम युवकांना आरोपी केले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए)  या प्रकरणात तपास सुरु केल्यानंतर त्या 9 जणांना सोडण्यात आले होते. बॉम्बस्फोट कट्टर हिंदुत्ववाद्यांनी केल्याचे एनआयएनने म्हटले होते.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी कोर्टात लावली हजेरी

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांनी 7 जूनसा कोर्टात हजर झाल्या होत्या. 2008 मध्य़े मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मुंबईतील विशेष  कोर्टात उपस्थित राहावे, असे आदेश देण्यात आले होते. सुरुवातीला मात्र त्या हजर राहणार नसल्याचे पत्राद्वारे कळवले होते. मात्र, त्यांची ही विनंती विशेष न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले.

दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा तरी सुनावणीसाठी कोर्टात उपस्थित रहाण्याचे आदेश एनआयएच्या मुंबईतील विशेष कोर्टाने दिले आहेत. या आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे कोर्टाने सर्व आरोपींना दणकाच दिला आहे.

Loading...

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणीसाध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी या आरोपींवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि भादंवि कलमांअंतर्गत बॉम्बस्फोटासारख्या दहशतवादी कारवाईचा कट रचणे, तो अमलात आणणे, त्यामुळे निष्पापांचा खून करणे, त्यांना गंभीररीत्या जखमी करणे इत्यादी गंभीर आरोपांतर्गत खटला चालवण्यात येत आहे. या प्रकरणी एनआयएच्या विशेष कोर्टात सुनावणी सुरु आहे.


VIDEO: चोरीला गेलेल्या बाळाचा 5 तासांत छडा, कुटुंबीयांना अश्रू अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2019 12:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...