News18 Lokmat

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए कोर्टाकडून आरोपनिश्चिती होणार का?

हायकोर्टानं आरोपींना दिलासा देण्यास नकार दिला होता

News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2018 08:23 AM IST

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए कोर्टाकडून आरोपनिश्चिती होणार का?

मुबई, ०५, सप्टेबर- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज विशेष एनआयए कोर्टाकडून आरोपनिश्चिती होण्याची शक्यता आहे. कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा आणि अन्य आरोपींवर आज आरोप निश्चित होतील, असा अंदाज आहे. काल हायकोर्टानं आरोपींना दिलासा देण्यास नकार दिला होता. गैरकृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलमं लावायची की नाही, हा निर्णय एनआयए कोर्टानं घ्यावा, असा निर्णय हायकोर्टानं दिला. तर कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला.

२००८ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह अन्य आरोपींवर करण्यात येणाऱ्या आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिलाय. पुरोहित याने खटला चालवण्यास देण्यात आलेल्या मंजुरीचा जो मुद्दा उपस्थित केला आहे, त्याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या निर्देशांनुसार घेण्यात यावा आणि त्यानुसार खटल्याचे पुढचे कामकाज करावे, असे आदेशही उच्च न्यायालयातर्फे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाला या वेळी देण्यात आले. बुधवारी या प्रकरणी विशेष एनआयए न्यायालय आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे.

राम कदम यांच्या या वक्तव्यामुळं झाला वाद : पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2018 08:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...