नागपुरात आमिष देऊन सरोगसी मदर बनविणारे रॅकेट सक्रिय!

नागपुरात आमिष देऊन सरोगसी मदर बनविणारे रॅकेट सक्रिय!

गरिब महिलांना लाखोंची रक्कम देण्याचे आमिष दाखवून त्यांना सरोगसी मदर बववुन नंतर त्यांना धमकविणार्या चार डॉक्टरांवर आणि दलालाचे काम करणाऱ्या दोघांवर नागपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

  • Share this:

नागपूर, 30 जुलै : गरिब महिलांना लाखोंची रक्कम देण्याचे आमिष दाखवून त्यांना सरोगसी मदर बववुन नंतर त्यांना धमकविणार्या चार डॉक्टरांवर आणि दलालाचे काम करणाऱ्या दोघांवर नागपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात एका सरोगसी मदरने तक्रार दाखल केल्यानंतर नंदनवन पोलिसांनी डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, डॉ. वर्षा ढवळे आणि डॉ. दर्शना पवार यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला. तर दललालाची भूमिका वटवणाऱ्या मनिष मुंधडा आणि त्याची पत्नी हर्षा यांना पोलिसांनी अटक केली आहे.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेल्या आमदाराची भेट नाकारली!

ज्या दाम्पत्याना अपत्य होत नाही अशा श्रीमंत दाम्पत्यांना सरोगसीच्या माध्यमातून मुल होण्यासाठी हे रॅकेट सक्रिय होतं. या प्रकरणात फसवल्या गेलेल्या आणखी महिला पुढे येण्याची शक्यता झोन पोलिस उपायुक्त निलेश भरणे यांनी वर्तविली आहे. नंदनवन पोलिसांनी ठाण्यात तक्रार दाखल केलेल्या सरोगसी मदरलासुद्धा लाखोंचे आमिष दाखविण्यात आले होते. ती गरोदर राहिल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी  तीला धमकवले. आपण फसविल्या गेलोय असे तीच्या लक्षात येताच तीने पोलीसात तक्रार दाखल केली. नंदनवन पोलीसांनी तीला धमकविणारे चार डॉक्टर डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, डॉ. वर्षा ढवळे आणि डॉ. दर्शना पवार यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तर या प्रकरणात दललालाची भूमिका वटवणाऱ्या मनिष मुंधडा आणि त्याची पत्नी हर्षा यांना पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा..

PHOTOS : डॅशिंग नांगरे पाटील मराठा आंदोलनात, कुठे शेकहँड तर कुठे सेल्फी !

VIDEO : मराठा आंदोलनात नांगरे पाटलांची एंट्री, तरुण पडला पाया !

मराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत !

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2018 08:55 PM IST

ताज्या बातम्या