सिंधुदुर्गावर ओढवलंय माकडतापाचं संकट,तीन महिन्यात एकाच गावात 9 मृत्यू

सिंधुदुर्गात आलेलं माकडतापाचं संकट दिवसेंदिवस आणखीनच तीव्र होतंय. या तापाने गेल्या तीन महिन्यात बांदा सटमटवाडी भागातल्या 9 जणांचा बळी घेतलाय .

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2017 09:35 PM IST

सिंधुदुर्गावर ओढवलंय माकडतापाचं संकट,तीन महिन्यात एकाच गावात 9 मृत्यू

दिनेश केळुस्कर, 12 एप्रिल  : सिंधुदुर्गात आलेलं माकडतापाचं संकट दिवसेंदिवस आणखीनच तीव्र होतंय. या तापाने गेल्या तीन महिन्यात बांदा सटमटवाडी भागातल्या  9 जणांचा बळी घेतलाय . तर या रोगापायी आत्तापर्यंत तीनशेहून अधिक माकडांचा मृत्यू झालाय . आरोग्य यंत्रणेने तळकोकणातल्या 21 गावात हाय अलर्ट जाहीर केला असून बांदा सटमटवाडी ,गाळेल आणि डिंगणे गावात विशेष दक्षता घेतली जातेय .

गेल्या महिन्यात आरोग्य विभागाने 246 जणांचे रक्तनमुने तपासले त्यात 85 जण माकडताप बाधित असल्याचे आढळले आहेत . यापैकी गोवा मेडिकल कॉलेज मध्ये 8 जणांवर उपचार सुरू आहेत. गाळेल ,बांदा आणि डिंगणे या तिनही गावातआरोग्य विभागाने दररोज रुग्ण तपासणी सुरू ठेवली आहे .

कॅसनूर फॉरेस्ट डिसीज म्हणजेच माकडताप नावाने ओळखला जाणारा हा आजार कर्नाटकातून पहिल्यांदा गेल्या वर्षी सिंधुदुर्गात दाखल झाला. माकडाना झालेल्या विशिष्ठ आजारात माकडाचा मृत्यू होतो आणि त्या माकडावरची गोचीड जर माणसाला चावली तर तो आजार माणसाला होऊन कमी प्रतिकारशक्ती असलेल्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो. कर्नाटकात आणि गोव्यातही या तापाने आत्तापर्यंत शेकडो बळी घेतले आहेत . या तापावरची लस कर्नाटक शासनाने तयार केली असून ही लस सिंधुदुर्गात मागवली जाणार आहे . माकडतापविरोधी लसीकरणाचा कार्यक्रम या पावसाळ्यात मार्गी लावला जाणार असल्याच आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2017 09:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...