कुंदन जाधव (प्रतिनिधी)
अकोला, 29 एप्रिल- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील सोनोरी गावात शॉर्टसर्किटने आग लागून एक घर जळून खाक झाल्याची घटना घडल्याचे समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी येथे शॉर्ट सर्किटमुळे एका घराला लागले. आगीत घर जळून पूर्णपणे खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोनोरी येथील प्लॉट वस्तीतील मोळीसाठी ठेवलेल्या लाकडांच्या गंजीवर विद्युतवाहक तार तुटून पडली. त्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीत फसरून सय्यद बशीर सय्यद शब्बीर यांच्या घराला लागली. त्यांचे घर जाळून खाक झाले. दारुल उलूम मदरशाच्या पाण्याचा टँकरमुळे आग आटोक्यात आली. अन्यथा आणखी मोठी घटना घडली असती.
मूर्तिजापूर येथील अग्निशामक दल, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आली. मात्र, घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. फसरून सय्यद बशीर यांचा संसार उघड्यावर आला आहे.
मुंबईतील बिग बाजारच्या आगीचा पहिला VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा