नाशकात एका फ्लॅटमध्ये स्फोटानंतर भडकली भीषण आग, भिंतीला गेले तडे

नाशिक शहरातील विनयनगर भागात असलेल्या एका बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये भीषण स्फोट झाला. स्फोट एवढा जबरदस्त होता की, ब्लास्टनंतर घराच्या भिंतीला तडे गेले आहेत. नंतर फ्लॅटमध्ये आग लागली.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 05:52 PM IST

नाशकात एका फ्लॅटमध्ये स्फोटानंतर भडकली भीषण आग, भिंतीला गेले तडे

प्रशांत बाग (प्रतिनिधी)

नाशिक, 22 मे-  शहरातील विनयनगर भागात असलेल्या एका बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये भीषण स्फोट झाला. स्फोट एवढा जबरदस्त होता की, ब्लास्टनंतर घराच्या भिंतीला तडे गेले आहेत. नंतर फ्लॅटमध्ये आग लागली. आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. सुदैवाने फ्लॅटमध्ये कोणीच नसल्यानं जीवितहानी नाही. स्फोटाचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. अचानक स्फोट झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत.

पवारसाहेब Vs विखे पाटील.. नगर आणि शिर्डीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्रचं लक्ष

मिळालेली माहिती अशी की, विनय नगरातील दमयंती को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यात फ्लॅटमधील अनेक विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहेत. यात कॉम्प्युटर आणि इतर गॅजेट्सचा समावेश आहे.  तसेच फ्लॅटच्या आतील भिंतीसह बाहेरील भिंतींनाही अक्षरश: तडे गेले आहेत.

इगतपुरी येथील कृषी विभागात कार्यरत कर्मचारी आर.आर.पाटील यांच्या मालकीच हा फ्लॅट आहे. शाळेला सुट्या असल्याने त्यांचे कुटुंबीय भुसावळला गेले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Loading...

नोट्स वेळेत न मिळाल्यामुळे विद्यार्थिनीची रॅट किल खाऊन आत्महत्या

सिलिंडर सहीसलामत मग नेमका स्फोट कशाचा...?

पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. फ्लॅटमध्ये सिलिंडर आणि वॉशिंग मशीन सहीसलामत आहेत. मग नेमका स्फोट कशाचा झाला, हा प्रश्न पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना पडला आहे.


VIDEO : आमदाराच्या हत्येनंतर मोठा उद्रेक, रस्त्यावर उतरून लोकांकडून निषेध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2019 05:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...