Spl Report:गडचिरोलीत निवडणूक सुरक्षित पार पडण्यासाठी पोलिसांनी केला 15 हजार किमीचा पायी प्रवास

Spl Report:गडचिरोलीत निवडणूक सुरक्षित पार पडण्यासाठी पोलिसांनी केला 15 हजार किमीचा पायी प्रवास

लोकसभा निवडणुकीत विदर्भात सर्वाधिक मतदान 72.2 टक्के गडचिरोली जिल्ह्यात झालं. गडचिरोलीची ही निवडणूक साधी नव्हती. निवडणुकीच्या काळात माओवाद्यांनी हिंसक कारवायाची जय्यत तयारी केली होती. काही घटना वगळता मोठ्या घटना रोखण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.

  • Share this:

महेश तिवारी (प्रतिनिधी)

गडचिरोली, 1 मे-  लोकसभा निवडणुकीत विदर्भात सर्वाधिक मतदान  72.2 टक्के गडचिरोली जिल्ह्यात झालं. गडचिरोलीची ही निवडणूक साधी नव्हती. निवडणुकीच्या काळात माओवाद्यांनी हिंसक कारवायाची जय्यत तयारी केली होती. काही घटना वगळता मोठ्या घटना रोखण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. मात्र, हे सहज घडलं नाही. या काळात गडचिरोली पोलिसांनी एकूण 15 हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला. राज्यात निवडणूक सुरक्षित पार पडण्यासाठी पोलिसांनी केलेलं सर्वात मोठ मानवी श्रम असलेलं राज्यातले एकमेव उदाहरण आहे. त्यामुळे निर्भयाचे वातावरण तयार झाल्यायाने जिल्ह्यात बहिष्काराचे आवाहन झुगारून मतदारानी बुलेटऐवजी बॅलेटवर विश्वास व्यक्त केला.

घनदाट जंगल..पोहोचायला नीट रस्ताही नाही तर दुर्गम भागात संपर्काचे कुठलेही साधन नाही. प्रत्येक पावलावर माओवादी हल्ल्याचे सावट इथे पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेल्या गडचिरोलीत राज्याच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत गडचिरोलीत कुठल्याही निवडणुकीची तयारी खूप आधी सुरु होते. मतदानाच्या दोन दिवस आधी बेस कॅपवर मतदान पथके पोहोचवावी लागतात. या बेस कॅपवर सुरक्षित मतदान पथके पोहोचण्यासह मतदान होऊन परत मुख्यालयात येण्याचा पायी प्रवास सुरक्षा दलाच्या गराडयात पार पडतो. यात काही ठिकाणी हेलीकॉप्टरची मदत घ्यावी लागते. या निवडणुकीत माओवाद्यांनी घातपाताची जय्यत तयारी करुन रस्त्यात पेरलेल्या भुसुरूंगस्फोटकांसह आयडी बॉम्ब अनेक ठिकाणी स्फोट करुन निवडणूक पथक आणि सुरक्षा दलाना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

गडचिरोली जिल्ह्यात मतदान पथकाला सुरक्षितपणे मतदान केंद्र तसेच बेस कॅम्पपर्यंत नेणे आणि परत मुख्यालयापर्यंत आणण्याचा प्रवास पूर्णपणे पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी पायी केला. मतदान पथकाला सोबत नेत असताना मतदान पथक वाहनात तर पोलीस वाहनासमोर आणि आजुबाजूला पायी अस चित्र होत हा केवळ मतदान पथकासंदर्भातला प्रवास होता. पोलिसांनी माओवाद्यांच्या विरोधात निवडणूक सुरक्षित राबविण्यासाठी पन्नास ते शंभर किलोमीटरपर्यंत जंगलात पंचवीस दिवसांचे माओवादविरोधी अभियान राबवले गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड तसेच तेलंगणाची चारशे किलोमीटरपर्यंत पसरलेल्या सीमेपर्यंत हे अभियान राबवण्यात आले. तिनशे पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्त्वात पाच हजार स्थानिक पोलिसासह बाहेरुन आलेल्या दहा हजार जवानासह पंधरा हजार जवानानी घनदाट जंगलातून मतदान पथकांना सुरक्षित बेस कॅम्पवर पोहोचवण्यासह सुरक्षित मतदान घडवून मतदान पथकाना मुख्यालयात आणून लोकशाहीचा उत्सव  जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले.

या निवडणुकीत वायुसेनेच्या दोन हेलीकॉप्टरच्या मदतीने मतदान पथकाना काही ठिकाणी नेण्यात आलं. उल्लेखनीय म्हणजे, भामरागड एटापल्ली तालुक्यात जंगलातून पायी प्रवास करणाऱ्या मतदान पथकासह पोलिसांवर काही ड्रोन कॅमे-याच्या माध्यमातून तालुका मुख्यालयात असलेले अधिकारी लक्ष ठेऊन होते. या ड्रोन कॅमे-यामुळे प्रत्येक पावलावरच्या प्रवासाची सुरक्षित काळजी घेण्यात आली. उलट दुर्गम भाग असलेल्या एटापल्ली भामरागड, धानोरा, सिरोंचा, अहेरी या तालुक्यात आदिवासी मतदारांनी तब्बल 15 ते 15 किलोमीटरचा पायी प्रवास करुन भरभरुन मतदान करुन लोकशाहीवरचा विश्वास मतपेटीतून व्यक्त केला.


VIDEO: नक्षलवाद्यांचा पुन्हा भ्याड हल्ला, 15 जवान शहीद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 04:33 PM IST

ताज्या बातम्या