विकासासाठी तरुणांनी बदलत्या संधीचा वेध घ्यावा - महेश म्हात्रे

विकासासाठी तरुणांनी बदलत्या संधीचा वेध घ्यावा - महेश म्हात्रे

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे रविवारी जठारपेठस्थित उत्सव मंगल कार्यालयात आयोजित ‘नापासांची शाळा’ या कार्यक्रमात ‘बदलत्या काळातील बदलते करिअर’ या विषयावर म्हात्रे बोलत होते.

  • Share this:

अकोला, 08 आॅगस्ट : देशाने उदारीकरणाचं धोरण स्वीकारल्यानंतर करिअरच्या संधी बदलत गेल्या. तसेच सेवा क्षेत्रात मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत; परंतु याकडे भारतीयांनी नेहमीच कानाडोळा केला आहे. विकासाची कास धरायची असेल, तर विद्यार्थी, तरुणांनी बदलत्या संधीचा वेध घेणे गरजेचे आहे,असे आवाहन आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांनी रविवारी अकोल्यात केले.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे रविवारी जठारपेठस्थित उत्सव मंगल कार्यालयात आयोजित ‘नापासांची शाळा’ या कार्यक्रमात ‘बदलत्या काळातील बदलते करिअर’ या विषयावर म्हात्रे बोलत होते. यावेळी महेश म्हात्रे यांच्याबरोबर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने (पाटील) यांची उपस्थिती होती.

स्वातंत्र्यांनंतर पहिली १० वर्ष देशाच्या विकासाचा वेग चांगला होता. यानंतर १९६२ मध्ये युद्ध झालं. त्यानंतर पुन्हा उतरत्या कळा लागल्या. मात्र, १९९१ पासून देशाने उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि तेथूनच करिअरच्या संधी बदलत गेल्या. सेवा क्षेत्रात मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत; परंतु याकडे भारतीयांनी नेहमीच कानाडोळा केला आहे. त्यामुळे विकास घडवायचा असेल, तर तरुणाईला या बदलत्या संधींकडे बघण्याची गरज आहे, असेही महेश म्हात्रे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2017 01:11 PM IST

ताज्या बातम्या