30 जुलै : चिंतामणी राइल्स मिल्स उद्योग समूहाचे संस्थापक श्री. चिंतामणी गेणबा मेंगडे यांच्या 9व्या पुण्यस्मरणानिमित्त आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांना सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दिला जाणार आहे. तर यावेळी संत साहित्याचे गाढे अभ्यासक सदानंद मोरे यांना समाजभूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा मंगळवार दिनांक 1 आॅगस्ट रोजी पुण्यातील भुगांव,ता. मुळशी येथे संपन्न होणार आहे. यावेळी प्रगतशील शेतकरी पुरस्कारही दिले जाणार आहेत. तसंच ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि प्रगतशील शेतकरी उपस्थिती राहणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा