घरात टीव्ही,फॅन,फ्रिज आणि एक ट्यूब,महावितरणने पाठवले दीड लाखांचे बिल !

News18 Lokmat | Updated On: Oct 6, 2018 08:24 PM IST

घरात टीव्ही,फॅन,फ्रिज आणि एक ट्यूब,महावितरणने पाठवले दीड लाखांचे बिल !

गणेश गायकवाड,06 आॅक्टोबर : अवघ्या १०० युनिटसाठी महावितरणने चक्क दीड लाखांचे बिल पाठवण्याचा अजब कारभार केलाय. उल्हासनगर जवळील म्हारळ परिसरातील भागवत काकडे यांना हे बिल आले आहे.

भागवत काकडे म्हारळ भागात दहा बाय दहाच्या खोलीत आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्याच्या घरात टीव्ही,फॅन, फ्रिज आणि एक ट्यूब आहे. मात्र तरी देखील त्यांना महावितरणाने १ लाख ५९ हजार इतकं बिल पाठवलंय.

सुरुवातीला हे बिल बघून त्यांना मोठा धक्का बसला. पुढे या संबधीची लेखी तक्रार त्यांनी महावितरण कार्यालयात केली मात्र वारंवार हेलपाटे मारून देखील त्यांना कोणी दाद देत नाही.

Loading...

गेल्या आठ महिन्यापासून महावितरणचे कामगार मिटरची रिडींग घेण्यास, वेळेवर बिल पाठवण्यात टाळाटाळ करतात असा त्यानी आरोप केला आहे.

त्याच्यासोबत या भागातील अनेकांना अशीच अव्वाच्या सव्वा बिले आली आहेत. आता महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारण्यासाठी पैसे नसल्याने हे बिल न भरण्याचे त्यांनी ठरवले आहे.

===============================================

आंबेनळी घाटातून बस बाहेर काढल्यानंतरचा पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2018 08:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...