'महारेरा' नोंदणीमध्ये मुंबईसह कोकण अव्वल तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर

'महारेरा' नोंदणीमध्ये मुंबईसह कोकण अव्वल तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर

31 जुलैपर्यंत झालेल्या नोंदणीत कोकण आणि पुणे विभागानं बाजी मारलीय.

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे

01 आॅगस्ट : राज्यभरातील विकासकांना एकच नियमावली लागू करून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी रियल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट राज्य सरकारने लागू केला. या कायद्यानुसार बिल्डरला आपल्या गृहप्रकल्पांची नोंदणी रेराकडे करावी लागणार होती. 31 जुलैला नोंदणीची शेवटची मुदत होती. मात्र आता ही मुदत वाढण्याचे संकेत महारेराच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिलेत. 31 जुलैपर्यंत झालेल्या नोंदणीत कोकण आणि पुणे विभागानं बाजी मारलीय.

राज्यातल्या गृहप्रकल्पात होणाऱ्या फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून महारेरा कायदा लागू करण्यात आलाय. त्यानुसार महारेराकडे आपल्या गृहप्रकल्पाची नोंदणी ३१ जुलैच्या आत करून घेणं विकासकांना बंधनकारक करण्यात आलं होतं. देशभरात असा कायदा लागू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं होतं ३१ जुलैपर्यंत ११ हजार पेक्षा अधिक नोंदणी अर्ज महारेराकडे करण्यात आले. त्यात सर्वात आघाडीवर (मुंबईसहित )कोकण विभाग तर दुसऱ्या क्रमांकावर पुणेविभाग आहे. नागपूर आणि नाशिक विभागातून मात्र या नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद मिळालाय.

महारेराकडे नोंदणी केलेल्या विकासकांकडून घर खरेदी करताना ग्राहकांना मोठा आधार मिळणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे विकासकाकडून ज्या गोष्टी ग्राहकांना घर खरेदी करताना अमेनिटीज किंवा इतर कुठल्याही प्रकारात सांगण्यात येणार असतील त्याचीही नोंद महारेराकडे करण आवश्यक असणार आहे. अन्यथा कठोर कारवाईची तरतूद रेरा मध्ये करण्यात आलीय. त्यामुळे विकासकांवर ही आता ग्राहकाभिमुख योजना राबवण्यासाठीचा दबाव वाढला आहे

मुंबई आणि पुणे शहराच्या आजूबाजूला होणाऱ्या बेकायदा बांधकामांची,  विक्रीची नोंदणी थांबवण्याचा विचार ही सरकारच्या विचाराधीन आहे. तसंच ३१ तारखेनंतर नोंदणी करणाऱ्या विकासकांबाबत काय सकारात्मक भूमिका घ्यायची याचाही विचार सरकार दरबारी सुरू आहे.

विभागनिहाय आकडेवारी

कोकण विभाग (मुंबईसह ):६१५०

पुणे विभाग :३४५०

नाशिक :५२०

नागपूर :३२०

औरंगाबाद :२७०

अमरावती :९०

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2017 11:03 PM IST

ताज्या बातम्या