S M L

कर्जमाफीच्या कामासाठी राज्यातील सर्व बँकांना महाशिवरात्रीची सुट्टी नाही

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे पूर्णत्वास नेण्यासाठी राज्यातील सर्व बँका महाशिवरात्री असूनही आज सुरुच राहणार आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 13, 2018 09:28 AM IST

कर्जमाफीच्या कामासाठी राज्यातील सर्व बँकांना महाशिवरात्रीची सुट्टी नाही

13 फेब्रुवारी : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे पूर्णत्वास नेण्यासाठी राज्यातील सर्व बँका महाशिवरात्री असूनही आज सुरुच राहणार आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी घेऊन महाशिवरात्री साजरा करता येणार नाही आहे.

यात राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अन्य बँकांच्या महाराष्ट्रातील सर्व शाखा आज मंगळवार दि. १३ फेब्रुवारी २०१८ रोजी सुरू राहणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात घेण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरंसिंगमध्ये बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज बँका सुरु ठेऊन पात्र खातेदारांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली होती. त्याला बँकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2018 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close