मान्सून जवळ येतोय, 'या' भागात वादळी पावसाचा वेधशाळेचा इशारा

मान्सून जवळ येतोय, 'या' भागात वादळी पावसाचा वेधशाळेचा इशारा

महाराष्ट्रासह दक्षिण भारतात अनेक ठिकाणी वादळी वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा इशारा वेधशाळेने दिला आहे. पुढच्या 24 तासांत कसं असेल हवामान?

  • Share this:

मुंबई, 5 जून : मान्सूनचं आगमन लांबलं असलं तरी आता राज्यात अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सूनची आगेकूच सुरू असून पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात धुवांधार बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD)जारी केलेल्या ताज्या इशाऱ्यानुसार देशात काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारतात अनेक ठिकाणी वादळी वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा इशारा वेधशाळेने दिला आहे.

मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी वातावरण ढगाळ राहील आणि दुपारनंतर वादळी वारे वाहतील. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील, असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. किनारी भागातही 5 आणि 6 जूनला वादळी पाऊस होऊ शकतो.

VIDEO: जळगावात वादळी वाऱ्याचा तडाखा; शेकडो एकर केळी पीक जमीनदोस्त

राज्यातल्या धरणांमध्ये फक्त 7 टक्के एवढाच पाणीसाठा, आता प्रतीक्षा पावसाची

त्याच वेळी राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, तेलंगणचा काही भाग इथे मात्र गरम वारे वाहण्याची शक्यता आहे. मराठवड्यात काही ठिकाणी पारा चढता राहू शकतो.

यावर्षी मान्सून सहा दिवसांनी उशिरा येणार आहे. खरंतर केरळमध्ये 1 जूनच्या आसपास पाऊस सुरू होतो पण यावेळी मात्र दक्षिणेकडच्या या पावसाच्या राज्यात मान्सूनची चिन्हं नाहीत.

उकाड्याने त्रासलेल्या अवस्थेत दिलासा! ही बातमी करणार महागाईपासूनही सुटका

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. उन्हाची तलखी जाणवतेय. त्यातच धरणांचा पाणीसाठा आटल्यामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरं जावं लागणार आहे. अशा स्थितीत सगळ्यांनाच पावसाची प्रतीक्षा आहे.

ईशान्येकडच्या राज्यात नागालँड, मिझोरम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालयमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो.

उन्हाची तलखी थोडी कमी

मान्सूनचं आगमन जवळ आल्यामुळे देशभरात आलेल्या उष्णतेच्या लाटेतून काहिसा दिलासा मिळेल. उत्तर भारतातल्या राज्यांमध्येही आता उन्हाच्या झळा काहिशा कमी झाल्या आहेत.

यावर्षी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पडल्याच नाहीत. त्यामुळे हा काळही पूर्णपणे शुष्क गेला. गेल्या 65 वर्षांत पहिल्यांदा मान्सूनपूर्व पावसाचं प्रमाण यावेळी अत्यल्प होतं.

भारताचा अर्थमंत्री

मान्सून हा भारताचा अर्थमंत्री आहे, असं म्हणतात. यावेळी पावसाने आणखीही काही दिवस ओढ दिली तर त्याचा पेरणीवर विपरित परिणाम होऊ शकतो. पाऊस चांगला पडला तर ग्रामीण भागात शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं. त्यावर आधारित उद्योगांनाही चांगले दिवस येतात. पण पावसाची अवकृपा झाली तर मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेलाच झळ बसते.


VIDEO: पुण्यात वन विभागाच्या कार्यालयात बॉम्बस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 02:31 PM IST

ताज्या बातम्या