Vidharbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान, हेमलकसाशी संपर्क तुटला

अतिवृष्टीने आलेल्या पुरात तब्बल 1 हजार 89 बकऱ्या वाहून गेल्या

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2018 09:51 AM IST

Vidharbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान, हेमलकसाशी संपर्क तुटला

गडचिरोली, १८ ऑगस्ट- दक्षिण गडचिरोली जिल्हयात पावसाचे थैमान घातले असून, अनेक दुर्गम गावांचा संपर्क तुटला आहे. गडचिरोली पर्लकोटा नदीला तिसऱ्यांदा पुराचा फटका बसलाय. पुरामुळे भामरागडसह १३० गावांचा संपर्क तुटला अलून पर्लकोटा नदीवरील मोठा पुल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. हेमलकसा ते भामरागडचा संपर्कही पूर्णपणे तुटला आहे. गडचिरोली जिल्हयातील अतिवृष्टीने आलेल्या पुरात तब्बल 1 हजार 89 बकऱ्या वाहून गेल्यामुळे त्यांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण गडचिरोली जिल्हयाला पावसाने झोडपून काढले आहे. या तालुक्यात राजाराम खांदला परिसरात चंद्रपुर जिल्हयातल्या मेंढपाळांनी बकऱ्या चरण्यासाठी आणल्या होत्या. अतिवृष्टीने राजाराम खांदलगतच्या सुर्यापल्ली नाल्याला पूर आला आणि या भागात असलेल्या १ हजार ८९ बकऱ्या पुरात वाहून गेल्या. पुर ओसरल्यानंतर ठिकठिकाणी बकऱ्यांचे मृतदेह सापडले.

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात अतिवृष्टीमुळे ६५ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.  तालुक्यात १५ तासांत तब्बल १२१.४२ मिमी पाऊस झाला. दोन दिवसाच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे १९४ जनावरे दगावली असून १३७२ घरांची पडझड झाली आहे. २४८ कुटुंबांना या पुराचा फटका बसला आहे. तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ८०५ मिमी आहे. सध्या एकूण ६५९.८६ मिमी पाऊस पडला, त्यामुळे आॅगस्ट महिन्यातच वार्षिक सरासरीच्या जवळपास आकडा पोहोचला आहे. पावसामुळे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे सर्व पाणी शेतात जमा झाल्याने पिकांचे नुकसान झाले. यावर्षी तालुक्यात ३३ हजार ४०० हेक्टरवर कापूस, २२ हजार ३०० हेक्टरवर सोयाबीन, ८ हजार ५०० हेक्टरवर तूर, ४०९ हेक्टरवर मूग, ३६५ हेक्टरवर उडीद यासह फळबाग व इतर पिकांची लागवड झाली आहे. मात्र अतिवृष्टीमुळे या सर्वच क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा-

नंदुरबारमध्ये पुराचे थैमान, 5 जणांचा मृत्यू

PHOTOS : साताऱ्यात पाणीच पाणी, ढोल्या गणपती मंदिरात शिरलं पाणी

Loading...

पत्नी वाहून गेली, पतीचा झाडामुळे वाचला जीव !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2018 09:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...