लक्ष्मण मानेंचे गंभीर आरोप, 'वंचित'च्या गोपीचंद पडळकरांनी केला पलटवार

लक्ष्मण माने यांनी 'वंचित'चे महासचिव गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर पडळकर यांनी मानेंवर पलटवार केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2019 03:35 PM IST

लक्ष्मण मानेंचे गंभीर आरोप, 'वंचित'च्या गोपीचंद पडळकरांनी केला पलटवार

मुंबई, 4 जुलै : वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले. तसंच 'वंचित'चे महासचिव गोपीचंद पडळकर यांच्यावरही निशाणा साधला. त्यानंतर पडळकर यांनी लक्ष्मण मानेंवर पलटवार केला आहे.

'लक्ष्मण माने यांना माझ्यावर आक्षेप होता तर त्यांनी याआधी झालेल्या वंचितच्या बैठकीत त्यावर भाष्य का केलं नाही? लोकसभा निवडणुकीनंतर आता दोन महिन्यांनी माने आमच्यावर आरोप करत आहेत. पक्षाने त्यांना प्रदेशाध्यक्षपद न दिल्यानेच ते असे आरोप करत आहेत,' असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी लक्ष्मण मानेंना उत्तर दिलं आहे.

काय आहे लक्ष्मण मानेंचा आरोप?

'वंचित आघाडीमुळे भाजपचाच फायदा होत आहे. वंचितमध्ये आरएसएस आणि भाजपच्या लोकांनी घुसखोरी केली आहे,' असं म्हणत वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा द्यावा, अशी मागणी लक्ष्मण माने यांनी केली आहे.

'लोकसभा निवडणुकीत आमच्यामुळे भाजपला 10 मिळाला. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे प्रतिगामी शक्तींचाच फायदा होत आहे. आता विधानसभा निवडणुकीतही आंबेडकर तीच भूमिका घेऊन पुढे चालले आहेत. हा पक्ष आता वंचितांचा राहिला नसून त्यामध्ये आरएसएसच्या लोकांनीच घुसखोरी केली आहे,' असं म्हणत लक्ष्मण मानेंनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Loading...

वंचितमध्ये उभी फूट

'हा पक्ष उभा करण्यासाठी आम्हीही परिश्रम घेतले आहेत. आंबेडकरांनी वंचित आघाडीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. आम्ही हा पक्ष नव्याने उभा करू. आमची वेगळी वाटचाल करू. प्रकाश आंबेडकरांनी आमचा वापर केला. त्यांच्याद्वारे अजूनही भारिपचं काम सुरू आहे,' असा आरोप लक्ष्मण मानेंनी केला आहे.

राजू शेट्टी-राज ठाकरेंचा विधानसभेसाठीचा प्लॅन ठरला? कृष्णकुंजवरील भेटीचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 03:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...