काँग्रेस-राष्ट्रवादीला वंचितनंतर 'हा' पक्षही देणार धक्का? दिला अखेरचा इशारा

एकीकडे वंचित बहुजन आघाडीसोबत अद्याप आघाडी करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली नसताना आणखी एका पक्षाने महाआघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 11:41 AM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीला वंचितनंतर 'हा' पक्षही देणार धक्का? दिला अखेरचा इशारा

मुंबई, 3 जुलै : लोकसभेतील परभवानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तरी चांगलं यश मिळावं, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून प्रयत्न करण्यात येत आहे. पण अशातच आघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे वंचित बहुजन आघाडीसोबत अद्याप आघाडी करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली नसताना आणखी एका पक्षाने महाआघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.

'विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला सन्मानजनक वागणूक द्यावी. आम्हाला कमीत-कमी 10 जागा हव्या आहेत. या जागा न दिल्यास आम्ही 50 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवू,' असा इशारा रिपाइंचे (गवई गट)नेते राजेंद्र गवई यांनी दिला आहे. त्यामुळे आघाडीच्या अडचणींत भर पडली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतून धडा घेऊन काँग्रेसने विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभेत काँग्रेसला फटका बसला होता. तो धोका टाळण्यासाठी वंचितशी आघाडीचा पर्याय काँग्रेसने खुला ठेवला आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी काँग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर सोपवली आहे अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

'येणारी निवडणूक महाराष्ट्र काँग्रेसच्या दृष्टीने महत्वाची आहे. काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केलीय. समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याआधी पक्षांच्या जिल्हा अध्यक्षांना विश्वासात घेऊन त्यांचे म्हणणे ऐकण्यात आले आहे,' अशी माहितीही अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

VIDEO : यांच्या धाडसाला सलाम ! जीव धोक्यात घालून पुरातून आजीला काढलं बाहेर

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2019 11:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...