'माजी खासदारसोबत भेट झाली, लवकरच भाजपमध्ये घेणार', दानवेंचा गौप्यस्फोट

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी गौप्यस्फोट केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 03:37 PM IST

'माजी खासदारसोबत भेट झाली, लवकरच भाजपमध्ये घेणार', दानवेंचा गौप्यस्फोट

पुणे, 6 जुलै : 'विरोधी पक्षातल्या एका माजी महिला खासदारासोबत भेट झाली आहे. जिल्ह्याध्यक्षांबरोबर बोलून त्यांना लवकरच भाजपमध्ये घेणार आहे,' असा गौप्यस्फोट भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेमकं कोण भाजपच्या संपर्कात आहे, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

'पक्षात कुणालाही घ्या. येण्यास बंदी नाही. काँग्रेसच्या माजी आमदार, खासदाराजवळ बसलं की त्याला वाटतं कधी आपल्या भाजपमध्ये घेतोय सध्या कुणीही भाजपमध्ये यायला तयार आहे. एका माजी महिला खासदाराला भेटलो आणि अंदाज घेतला. आता जिल्हा अध्यक्षाशी बोलतो आणि पक्षात घेतो,' असं रावसाहेब दानवे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.

दानवेंची फटकेबाजी

'या निवडणुकीत मतदारसंघात गेलो नाही. बूथ वर गेलो नाही. फक्त मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. पण मी त्यातही गेलो नाही. कारण आजारी होतो. तरीही साडे तीन लाखांनी निवडून आलो. निवडणूक काळात फिरकलं नाही तरी काही फरक पडत नाही. कारण काम केलेलं असतं,' असं म्हणत दानवे यांनी आपल्या निवडणूक विजयाचा फॉर्म्युला सांगितला.

काँग्रेसवर निशाणा

Loading...

'काँग्रेसला आता अध्यक्ष मिळत नाही. काँग्रेसची स्थिती सध्या वाईट आहे. भाजपला मात्र अच्छे दिन आले आहेत. मोदींची लोकप्रियता, अमित शहा यांची रणनीती आणि कार्यकर्त्यांचे कष्ट यामुळे हे शक्य झालं. दुसरीकडे, काँग्रेसचे नेते रणांगण सोडून पळू लागले. चांगले दिवस असताना घरातला अध्यक्ष आणि वाईट दिवस असताना कुणी पण अध्यक्ष करायला तयार होतात, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी गांधी परिवारावर टीका केली आहे.

EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 03:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...