'वंचित'च्या अजब ऑफरवर भडकले काँग्रेसचे नेते, विजय वडेट्टीवार म्हणाले...

'वंचित आमच्यासोबत आली नाही तर जनता ठरवेल की वंचित नेमकी कुणाची बी टीम आहे.'

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 04:41 PM IST

'वंचित'च्या अजब ऑफरवर भडकले काँग्रेसचे नेते, विजय वडेट्टीवार म्हणाले...

मुंबई, 3 जुलै : 'विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला आम्ही 40 जागा सोडत आहोत. वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या 248 जागांवर निवडणूक लढवेल. त्यांना मंजूर असेल तर त्यांनी येत्या 10 दिवसांत उत्तर द्यावे,' अशी भूमिका वंचितने घेतली आहे. वंचित आघाडीच्या या भूमिकेबाबत काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

'वंचितसोबत आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमचे नेते त्यावर चर्चा करतील. पण वंचितने दिलेली ऑफर म्हणजे भाजपला मदत करायची आहे का? असा प्रश्न पडतो. वंचित आमच्यासोबत आली नाही तर जनता ठरवेल की वंचित नेमकी कुणाची बी टीम आहे,' असं म्हणत काँग्रेस नेते आणि विधानसभेची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, वंचितच्या या फॉर्म्युल्यामुळे काँग्रेस मात्र चांगलीच अडचणीत सापडली आहे. कारण पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या वंचित आघाडीने थेट 248 जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. तर काँग्रेसने फक्त 40 जागा लढवाव्यात, असं वंचितचं म्हणणं आहे.

एकीकडे वंचित बहुजन आघाडीसोबत अद्याप आघाडी करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली नसताना आणखी एका पक्षाने महाआघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. 'विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला सन्मानजनक वागणूक द्यावी. आम्हाला कमीत-कमी 10 जागा हव्या आहेत. या जागा न दिल्यास आम्ही 50 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवू,' असा इशारा रिपाइंचे (गवई गट)नेते राजेंद्र गवई यांनी दिला आहे. त्यामुळे आघाडीच्या अडचणींत भर पडली आहे.

लोकसभा निवडणुकीतून धडा घेऊन काँग्रेसने विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभेत काँग्रेसला फटका बसला होता. तो धोका टाळण्यासाठी वंचितशी आघाडीचा पर्याय काँग्रेसने खुला ठेवला आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी काँग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर सोपवली आहे अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

Loading...

'देवदर्शन करण्याऐवजी शिवसेना पक्षप्रमुखांनी नालेसफाई करायला हवी होती'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 04:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...