भाजप नेत्यांची धाकधूक वाढली, 30 आमदारांना घरी बसावं लागणार?

भाजपने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर चांगलं यश मिळवत 122 जागा जिंकल्या होत्या.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 02:25 PM IST

भाजप नेत्यांची धाकधूक वाढली, 30 आमदारांना घरी बसावं लागणार?

मुंबई, 27 जून : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मुख्य सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढले. पण आता मात्र आघाडी आणि युती अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. भाजपनेही त्याच दृष्टीने पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे.

भाजपने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर चांगलं यश मिळवत 122 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर आताच्या लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त करत भाजपने केंद्रात दुसऱ्यांदा सत्ता मिळवली. पण असं असलं तरीही आगामी विधानसभा निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी भाजपने रणनीती तयार केली आहे. यानुसार भाजपकडून 25 ते 30 विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे.

कोणत्या आमदारांचा पत्ता होणार कट?

आमदारांचा तिकीट कापताना भाजपकडून काही निकष लावण्यात येणार आहेत. ज्या मतदारसंघांत पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगलं यश मिळालं नाही, अश आमदारांचं तिकीट भाजपकडून कापण्यात येणार आहे. तसंच ज्या आमदारांनी मागील 5 वर्षांत लोकप्रतिनिधी म्हणून प्रभावी कामगिरी केली नाही, अशा आमदारांनाही भाजप उमेदवारी देणार नाही.

मुख्यमंत्रिपदासाठी सेना-भाजपमध्ये रस्सीखेच

Loading...

महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षा काही लपून राहिल्या नाहीत. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी सामनातून याबाबत जाहीर भाष्य केलं होतं.

'आमचं सगळं ठरलं आहे. यापुढे सगळं समसमान पाहिजे,' अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच जाहीर केली. पण उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला भाजपने धक्का दिला. भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी आगामी मुख्यमंत्री भाजपचाच होणार, असा दावा केल्याने युतीत वादाची ठिणगी पडली होती.

करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2019 02:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...