विधानसभेच्या तोंडावर BJPची नवी रणनीती, पवारांचा कट्टर विरोधक पुण्याच्या पालकमंत्रिपदी?

विधानसभेच्या तोंडावर BJPची नवी रणनीती, पवारांचा कट्टर विरोधक पुण्याच्या पालकमंत्रिपदी?

maharashtra vidhan sabha election : शरद पवारांना शह देण्याची भाजपची रणनीती.

  • Share this:

पुणे, वैभव सोनवणे, 04 जून : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना होम टाऊनमध्ये शह देण्यासाठी आता भाजपनं हालचाली सुरू केल्या आहेत. कारण, काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांना पुण्याचे पालकमंत्री करण्याची हालचाल भाजपनं सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.  त्यामुळे आता पुण्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जागा वाटपावरून नाराज असलेल्या राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आपल्या विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवाय, त्यांनी आघाडीच्या प्रचाराला जाणं देखील टाळलं. तर, त्यांचा मुलगा डॉ. सुजय विखे – पाटील यांनी कमळाला हात देत भाजपच्या तिकीटावर नगरमधून लोकसभा निवडणूक लढवली. या लढतीत डॉ. सुजय विखे – पाटील यांनी विजय देखील मिळवला. हा विजय आपण आजोबांना अर्पण करत असल्याचं म्हणत त्यांन शरद पवारांना टोला हाणला. त्यानंतर भाजप आणखी एक धक्का शरद पवार यांना देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी सध्या रणनीती आखली जात आहे.


राधाकृष्ण विखे-पाटलांचा 'भाजप'प्रवेश निश्चित? 'या' काँग्रेस आमदारांसह खबलतं सुरू

राधाकृष्ण विखे – पाटील भाजपच्या वाटेवर?

काँग्रेसमध्ये नाराज असलेले राधाकृष्ण विखे – पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. राधाकृष्ण विखे – पाटील यांनी देखील केलेल्या वक्तव्यांवरून त्यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याचं बोललं जात आहे. पण, राधाकृष्ण विखे – पाटील आता भाजपमध्ये केव्हा प्रवेश करणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.


लग्नाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या, आरोपी गजाआड

पवार – विखे राजकीय वाद

शरद पवार आणि राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यामध्ये असलेले राजकीय वाद सर्वश्रृत आहेत. त्यामुळे पवारांच्या कट्टर विरोधकाला पुण्याचं पालकमंत्रीपद देण्याच्या हालचाली आता भाजपमध्ये सुरू झाल्या आहेत.


SPECIAL REPORT : नगरमध्ये पेटला विखे विरुद्ध थोरात संघर्ष, काय आहे कारण?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 09:55 AM IST

ताज्या बातम्या