मराठवाड्यातील काँग्रेसच्या या बड्या नेत्याच्या प्रवेशाला भाजपमधूनच विरोध!

मराठवाड्यातील काँग्रेसच्या या बड्या नेत्याच्या प्रवेशाला भाजपमधूनच विरोध!

maharashtra vidhan sabha election : मराठवाड्यातील बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्याच्या संभाव्य भाजप प्रवेशाला आता विरोध केला जात आहे.

  • Share this:

औरंगाबाद, सिद्धार्थ गोदाम, 04 जून : काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार देखील राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जातं आहे. सध्या अब्दुल सत्तार हे राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यासह मुंबईत चर्चा करत आहेत. पण, अब्दुल सत्तार यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला मात्र सिल्लोड भाजपनं विरोध दर्शवला आहे. त्याबाबत सिल्लोड तालुका भाजप कार्यकारिणीची बैठक देखील बोलावण्यात आली असून या बैठकीला तालुक्यातील सर्व पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. सत्तार यांनी काँग्रेसमध्ये असताना  भाजपला केलेल्या विरोधामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सत्तार यांच्याविरोधात नाराजी आहे.  अब्दुल सत्तार यांना यापूर्वीच काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.

काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे – पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झालं आहे. विखे – पाटील आपल्या आमदारकीचा आज राजीनामा देणार असल्याची देखील शक्यता आहे. तत्पूर्वी ते काही काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा देखील करत आहेत.


राधाकृष्ण विखे-पाटलांचा 'भाजप'प्रवेश निश्चित; 'या' काँग्रेस आमदारांसह खबलतं सुरू

काँग्रेस आमदारांसह विखेंची खलबतं

काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण पाटील यांचा भाजप प्रवेश हा जवळपास निश्चित झाला आहे. भाजप प्रवेशापूर्वी राधाकृष्ण विखे – पाटील यांची मुंबईत काँग्रेस आमदारांसह खलबतं सुरू झाली आहेत. काँग्रेसचे आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार आणि माढाचे खासदार रणजित निंबाळकर यांच्यासह ही खलबतं सुरू आहेत. भाजप प्रवेश करण्यापूर्वी विखे – पाटील काही काँग्रेसच्या आमदारांशी संवाद साधत आहेत. शिवाय, राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यासह किती आमदार भाजप भाजप प्रवेश करणार? हे देखील पाहावं लागणार आहे.

राधाकृष्ण विखे - पाटील हे आपल्या आमदारकीचा आज राजीनामा देण्याची देखील शक्यत आहे. विधीमंडळात जाऊन विखे - पाटील राजीनामा देणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीवेळी नाराज असलेल्या राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आघाडीचा प्रचार करणं देखील टाळलं होतं. त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश केव्हा होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. पण, लवकरच राधाकृष्ण विखे – पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.


SPECIAL REPORT: हिंदी भाषेच्या सक्तीवरून सरकारचा यूटर्न?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 12:59 PM IST

ताज्या बातम्या