यवतमाळमध्ये ट्रक आणि क्रुझरची जोरदार धडक, नववधूसह 3 जणांचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावजवळ ट्रक आणि क्रुझरची भीषण धडक झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 11:26 AM IST

यवतमाळमध्ये ट्रक आणि क्रुझरची जोरदार धडक, नववधूसह 3 जणांचा मृत्यू

यवतमाळ, 30 एप्रिल : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावजवळ ट्रक आणि क्रुझरची भीषण धडक झाली आहे. यामध्ये नववधूसह तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. चंद्रपूर येथील महांकाली देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतत असताना उपरे कुटुंबीयांवर काळानं घाला घातला. त्यांच्या कारला मारेगावपासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अक्षरा रेस्टॉरंटजवळ अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत.  लक्ष्मीबाई उपरे, सानिका किसन गोपाळे आणि नववधू साक्षी देवीदास उपरे अशी मृतांची नावं आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्यांना नागपूरमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यातआले आहे.

कोल्हापूरमध्येही भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू


गडहिंग्लज-चंदगड राज्य महामार्गावर हरळी इथे कंटेनरची थांबलेल्या कारला धडक बसली. या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी(29 एप्रिल) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कंटेनरने दिलेली धडक इतकी भीषण होती की यात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यमुखी पडलेले सर्व तरुण हे महागाव येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. मित्राला भेटून हॉस्टेलवर परत येत असताना हरळी येथे अपघात झाला.

वाचा अन्य बातम्या

‘ATS प्रमुख म्हणून हेमंत करकरेंची भूमिका अयोग्य’, आता सुमित्रा महाजनांचं वादग्रस्त विधान

Loading...

VIDEO: 'तू मेरी हिट लिस्ट में है', भाजप नेत्याची थेट पोलिसाला धमकी

हाय अलर्ट! फानी चक्रीवादळाचा 'या' राज्यांना बसणार तडाखा

SPECIAL REPORT : राज ठाकरेंचा 'X फॅक्टर', आता पुढची तयारी...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2019 11:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...