पर्यटन व्यवसायात महाराष्ट्राची पीछेहाट

गेल्या दोन वर्षांत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राला मागे टाकत दिल्ली देशातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन राज्य ठरलं आहे. तर गोव्याने तिसऱ्या क्रमांकावरून उडी घेत महाराष्ट्रासह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 25, 2017 10:04 AM IST

पर्यटन व्यवसायात महाराष्ट्राची पीछेहाट

25 डिसेंबर: जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली 'व्हिजिट महाराष्ट्र' मोहीम अंतिम टप्प्यात असताना याचा फायदा होण्याऐवजी पर्यटन विकासात महाराष्ट्राची पीछेहाट झालेली दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशातील परदेशी पर्यटकांची संख्या वाढली, मात्र महाराष्ट्रातील घटली आहे. गेल्या दोन वर्षांत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राला मागे टाकत दिल्ली देशातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन राज्य ठरलं आहे. तर गोव्याने तिसऱ्या क्रमांकावरून उडी घेत महाराष्ट्रासह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे.

राज्याचे पर्यटनासाठी असलेलं कमी बजेट, ब्रँडेड हॉटेल्सची कमी आणि कनेक्टिव्हिटीच्या निकषात कमी पडल्याने महाराष्ट्राचा दर्जा घसरला आहे. वर्ल्ड ट्रॅव्हल्स टुरिझम काैन्सिल इंडिया इनिशिएटीव्हच्या वतीने दरवर्षी देशातील पर्यटनविषयक सर्वेक्षण केलं जातं. त्यात ही बाब समोर आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2017 10:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...