शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकार घेणार मोठा निर्णय

शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकार घेणार मोठा निर्णय

पुढील काही दिवसांमध्ये शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, विवेक कुलकर्णी, 21 मे : राज्य सरकार आता शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी आता राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. मार्च 2016 ते 2018 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा सध्या राज्य सरकार गांभीर्यानं विचार करत आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्ष विधानसभेची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे. शिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुलैपासून राज्यभर विकास यात्रा देखील काढणार आहेत. राज्यात सध्या भीषण दुष्काळ असून सध्या शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहे. यापूर्वी देखील राज्य सरकारनं काही निकषांवर शेतकरी कर्जमाफी केली होती. पण, आता सरसकट कर्जमाफीचा विचार राज्य सरकार करत आहे.


नरेंद्र मोदींचं ध्यान म्हणजे नौटंकी - शरद पवार

राज्यात दुष्काळाची भीषणता

राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. पाण्यासाठी वणवण वाढली असून जनावरं चारा छावण्यांमध्ये बांधली जात आहे. पण, सरकारनं केलेल्या उपाययोजनांबद्दल लोकांमध्ये तितकसं समाधान दिसत नाही. पावसानं ओढ दिल्यानं शेती देखील हातची गेली.

बळीराजा वाढत्या कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहे. मागील काही दिवसांमध्ये नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्याचं दिसून येत आहे. पाण्याअभावी पिकं करपली. शिवाय, मेहनत करून जगवलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदील झाला आहे. पण, आता कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल राज्य सरकार मोठा निर्णय घेणार असून मार्च 2016 ते 2018 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.

पुढील काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात दौरा करून परिस्थितीचा देखील आढावा घेणार आहेत.


मोदींचा दौरा, राजकारण आणि एक्झिट पोलवर काय म्हणाले शरद पवार? पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 11:22 AM IST

ताज्या बातम्या