सर्वसामान्यांना झटका; दर घटताच राज्य सरकारने पेट्रोलवरचा अधिभार वाढवला!

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 17, 2017 09:18 AM IST

सर्वसामान्यांना झटका; दर घटताच राज्य सरकारने पेट्रोलवरचा अधिभार वाढवला!

17 मे : तेल कंपन्यांनी सोमवारी रात्री पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली पण त्याचा महाराष्ट्रातील वाहन चालकांना फायदा होणार नाहीय. कारण पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होताच महाराष्ट्र सरकारने महसूल वाढवण्यासाठी इंधनावरील सरचार्ज 2 रुपयांनी वाढवला आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोल स्वस्त होऊनही, राज्यात एक रुपया अधिभार लागू केल्याने दर दोन रुपयांनी वाढले आहे.

सोमवारी रात्री तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत प्रती लीटर 2 रुपये 16 पैशांची  तर डिझेलच्या किंमतीत प्रती लीटर  2 रुपये 10 पैशांनी कमी केल्या होत्या. राज्यसरकारने मंगळवारी रात्री इंधनावर एक रुपया सरचार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही सुरू केली.

त्यामुळे या दर कपातीची महाराष्ट्रातील वाहन चालकांना फायदा होणार नाहीय. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल नियंत्रण मुक्त केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरानुसार तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी-जास्त करत असतात.  1 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किंचित वाढ करण्यात आली होती.  त्यावेळी पेट्रोलच्या किंमतीत 1 पैसा तर डिझेलच्या किंमतीत 44 पैशांची वाढ करण्यात आली होती. 16 एप्रिल रोजी  पेट्रोलच्या किंमतीत 1 रुपये 39 पैसे प्रती लीटर तर डिझेलच्या किंमतीत 1 रूपया 4 पैशांची वाढ झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2017 09:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...