तुटपुंज्या पगारावर 'धावणाऱ्या' एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आजपर्यंतचा प्रवास

तुटपुंज्या पगारावर 'धावणाऱ्या' एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आजपर्यंतचा प्रवास

  • Share this:

18 आॅक्टोबर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या 2 दिवसांपासून संपावर गेले आहे. ऐन दिवाळ सणाच्या तोंडावर संप पुकारल्यामुळे दोन दिवसांत अंदाजे 32 कोटींचं एसटी महामंडळाचं नुकसान झालंय. विशेष म्हणजे, दर चार वर्षांने वेतन वाढीचा करार केला जातो पण 18 महिने उलटले तरी वेतन वाढीचा निर्णय झालेला नाही.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा इतिहास

-दर चार वर्षांनी वेतन वाढीचा एस टी कर्मचाऱ्यांचा करार केला जातो

-एप्रिल 2012 मध्ये शेवटचा करार,मार्च 2016 मध्ये या कराराची मुदत संपली.

-18 महिन्या पासून वेतन वाढीचा करार नाही

एसटीमधील कर्मचाऱ्यांचा पगार

-चालक-8,500 ते 9000

-वाहक-8,000 ते 8,500

-यांत्रिक कारागीर-8,500 ते 9000

या पूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी 1972 साली 13 दिवसाचा बेमुदत बंद केला होता. हा सर्वात मोठा बंद होता त्यानंतर आतापर्यंत एक दिवसीय,अर्धा दिवस बंद आंदोलन झाली आहेत. पण 1972 इतका मोठा बंद झाला नव्हता.

महाराष्ट्रामध्ये एकूण 250 एसटी डेपो आहेत. रोज सकाळी 8 पर्यंत 6,500 एसटी डेपोमधून बाहेर पडतात. आज फक्त 80 एसटी बाहेर पडल्या आहेत.

संपामुळे 32 कोटी नुकसान

17 ते 22 कोटी रोजच उत्पन्न आहे, दिवाळीच्या काळात ते 28 ते 32 कोटी पर्यंत जाते. संपामुळे दररोजचे नुकसान होते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2017 11:28 AM IST

ताज्या बातम्या