SSC RESULT 2019 : 10 वीचा निकाल आज नाही, बोर्डाकडून खुलासा

काही वृत्तसंस्था आज दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचं वृत्त देत होतं.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 04:32 PM IST

SSC RESULT 2019 : 10 वीचा निकाल आज नाही, बोर्डाकडून खुलासा

वैभव सोनवणे, पुणे, 6 जून : बारावीनंतर आता दहावीचे विद्यार्थी निकालाची प्रतीक्षा करत आहेत. काही वृत्तसंस्था आज दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचं वृत्त देत होतं. पण News18 Lokmatशी बोलताना बोर्डाच्या अध्यक्षांनी हे वृत्त फेटाळत आज दहावीचा निकाल जाहीर होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. SSC RESULT 2019 या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

दहावीच्या परिक्षेला निकाल आज लागणार नसला तरीही लवकरच SSC म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल maharesult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवरून जाहीर होईल. शिवाय 'News18 Lokmat'च्या वेबसाइटवरही बोर्डाच्या परीक्षेचा निकाल अधिकृतपणे पाहता येणार आहे.

निकालाच्या तारखेसंदर्भातील अधिकृत माहिती आल्यास आम्ही सर्वप्रथम तुमच्यापर्यंत ती नक्कीच पोहोचवू. दरम्यान, 10 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 7 किंवा 8 जूनला लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण बोर्डाच्या वतीने अद्याप निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता होती. हे लक्षात घेता 6 ते 8 जून दरम्यान निकाल लागू शकतो, असं म्हटलं जात आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल 28 मे रोजी दुपारी 1 वाजता बोर्डाच्या बेवसाइटवर लागला होता. त्याप्रमाणे 10 वीचा निकालसुद्धा दुपारी जाहीर होण्याची शक्यता आहे.


Loading...

VIDEO : 'तर बंड झाल्याशिवाय राहणार नाही', रायगडावर उदयनराजेंचा आक्रमक अवतार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 11:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...