SSC Result 2019, Maharashtra Board: 10 वीच्या निकालानंतर गोंधळून जाऊ नका, असं निवडा तुमचं करिअर

दहावी हा करिअरच्या मार्गावरचा महत्त्वाचा टप्पा. खऱ्या अर्थाने पुढच्या आयुष्याची दिशा या निकालानंतर ठरते.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 09:53 AM IST

SSC Result 2019, Maharashtra Board: 10 वीच्या निकालानंतर गोंधळून जाऊ नका, असं निवडा तुमचं करिअर

मुंबई, 6 जून : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. दहावी हा करिअरच्या मार्गावरचा महत्त्वाचा टप्पा. खऱ्या अर्थाने पुढच्या आयुष्याची दिशा या निकालानंतर ठरते. कारण कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं हा महत्त्वाचा निर्णय या टप्प्यावर घ्यावा लागतो.

माजी आयएएस अधिकारी आणि करिअर मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी सांगतात, "तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या क्षेत्रात उत्तमतेचा ध्यास घेतला तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. इंजिनिअरिंग, मेडिकल अशा चाकोरीच्या वाटा सोडून वेगळ्या क्षेत्रातल्या संधी निवडण्याचं धाडस तुम्ही दाखवायला हवं."

दहावीत कमी मार्क मिळाले तर...

तुम्ही विज्ञान, गणित या विषयांत हुशार असलात तरच हुशार आणि एखाद्या कलेत प्रवीण असाल तर मात्र हुशार नाही, हा समजच चुकीचा आहे, असं अविनाश धर्माधिकारी म्हणतात. पुस्तकी बुद्धिमत्ता म्हणजेच फक्त हुशारी, असं नव्हे. दहावी - बारावीला मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रचंड कौतुक होतं. पण हेच विद्यार्थी पुढच्या 20- 25 वर्षांनी कुठे आहेत हे तुम्हाला माहीत असतं का? याउलट जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात यशस्वी झालेल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही विचारून बघा. तुम्हाला दहावी, बारावीमध्ये किती मार्क मिळाले होते... काय असेल त्यांचं उत्तर? त्यांच्या या उत्तरातून तुम्हाला जीवनात यशस्वी होण्याचे धडे मिळतील, असं धर्माधिकारी सांगतात.


Loading...

VIDEO: 'जय भवानी, जय शिवाजी' च्या जयघोषानं रायगड दुमदुमला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2019 09:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...