रत्नागिरीमधील तिवरे धरण फुटले; 6 मृतदेह सापडले, 16 जण बेपत्ता! Maharashtra | Ratnagiri| Tiware dam| Dam Breached | Chiplun

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नादुरुस्त तिवरे धरण काल रात्री फुटल्याची घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 12:38 PM IST

रत्नागिरीमधील तिवरे धरण फुटले; 6 मृतदेह सापडले, 16 जण बेपत्ता! Maharashtra | Ratnagiri| Tiware dam| Dam Breached | Chiplun

चिपळूण, 03 जुलै: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण (Chiplun) तालुक्यातील नादुरुस्त तिवरे धरण (Tiware dam) काल रात्री फुटल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री 8 ते 9च्या सुमारास ही घटना घडली असून यात 23 ते 25 जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे काढावरील 5 घरांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. धरण फुटल्यामुळे भेंडेवाडी (तिवरे गाव) या गावावर संकट कोसळले आहे. गावातील 25 जण बेपत्ता आहेत. त्यापैकी 6 मृतदेह सापडले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागात हे गाव आहे. घटनेची माहिती मिळता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण मध्यरात्री 2 वाजता घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले असून परिसरातील अन्य गावांना अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Loading...

या घटनेनंतर NDRFच्या पथकाला मदतीसाठी बोलवण्यात आले आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले तिवरे धरण रात्री 9 च्या सुमारास भरले होते. आधीच धरण भरले होते त्यात मुसळधार पावसामुळे रात्री फुटले. यामुळे धरणाच्या पायथ्याशी असलेली एक वाडीच वाहून गेली. धरण फुटल्यानंतर वाशिष्टी नदीला पुर आला असून अनेक गावांना अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाजवळचा दादर पूल देखील पाण्याखाली गेला आहे. तर ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांशी असलेला संपर्क तुटला आहे.

तिवरे धरण फुटलं; 23 जण बेपत्ता, ही आहेत नावं

असे आहे तिवरे धरण-

तिवरे धरण हे लघु पाटबंधारे विभागाचे धरण आहे सदर धरणाची साठवणूक क्षमता 2.452 दशलक्ष घनमीटर / 0.08 टीएमसी येवढी आहे. सदर धरणाचे बांधकाम 2012 साली पूर्ण झाले आहे. सदर धरण फुटल्यामुळे तिवरे व धणेगाव यांना धोका आहे. पुढे जाऊन हे पाणी वाशिष्टी नदीला जाऊन मिळते.

तेवरे धरण फुटले: काय झालं नेमकं काल रात्री

धरण फुटणार याची कल्पना होती

धरण फुटणार असल्याची शक्यता असल्याने या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा याबाबत निवेदन दिले होते. पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

VIDEO: चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्यानं ग्रामस्थांवर आस्मानी संकट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 06:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...