महाराष्ट्रात पुन्हा पेटणार काका पुतण्याचं राजकारण

महाराष्ट्रात पुन्हा पेटणार काका पुतण्याचं राजकारण

यापू्र्वी बीड जिल्हात गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे काका पुतणे वाद रंगला होता. आता क्षीरसागर कुटुंबात काका विरुद्ध पुतण्या असा वाद रंगणार आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई 23 जून : राष्ट्रवादीच्या विधानसभा आढावा बैठकीत बीड विधानसभेसाठी संदीप क्षीरसागर यांना शरद पवारांनी हिरवा कंदील दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. संदीप क्षीरसागर यांचे काका मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करा असा आदेश संदीप यांना देण्यात आलाय.

यापू्र्वी बीड जिल्हात गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे काका पुतणे वाद रंगला होता. महाराष्ट्राच्या राजकारणातही बाळासाहेब ठाकरे विरुद्ध राज ठाकरे या काक पुतण्या वाद रंगला होता. आता बीड विधानसभेसाठी जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी जयदत्त क्षीरसागर यांना बळ देणार आहे.

संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. काही दिवसआधीच जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात आपल्याला कमी महत्त्व दिले जाते असं जयदत्त क्षीरसागर यांना वाटत होतं. तिथे धनंजय मुंडे यांचं वजन वाढत असल्याने त्या दोन नेत्यांमध्ये फारसं सख्य नव्हतं.

अनेक दिवस तक्रार करुनही दखल घेतली जात नसल्याने बदलतं राजकारण ओळखून जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि मंत्रिमंडळविस्तारात त्यांना कॅबिनेटमंत्रीपदही मिळालं.

निलम गोऱ्हेंचं नाव निश्चित

विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक सोमवारी (24 जून) बिनविरोध होण्याची शक्यता आहे. संख्याबळानुसार युतीचं संख्याबळ वरचढ होत असल्याने आघाडीकडून उमेदवार उभा करण्याची शक्यता शक्यता कमी आहे. सोमवारीच परिषदेचे उपसभापती आणि विरोधपक्षनेतेपदाची निवड होणार आहे. दुपारी ही निवड होईल आणि नावं जाहीर होणार आहेत.

विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीच्या बदल्यात परिषदेच्या उपसभापतीपदाची निवड बिनविरोध करण्याची अट सत्ताधारी पक्षाकडून घालण्यात आली होती. अशा प्रकारचं सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांनाही दिले होते. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा होऊन परिषदेत उपसभापतीपदासाठी उमेदवार उभा करायचा नाही असं ठरलं आणि विरोधी पक्षनेतेपदाचाही मार्ग मोकळा झाला.

विदर्भातले नेते विजय वड्डेट्टीवार यांचं नाव काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासाठी निश्चित केलं आहे. वड्डेट्टीवार हे आक्रमक असून विदर्भातलेच असल्याने देवेंद्र फडणवीसांना आक्रमकपणे अंगावर घेतील अशी काँग्रेसची व्ह्युरचना आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये गेल्याने विरोधी पक्षनेतेपदी कुणाची निवड करायची असा प्रश्न काँग्रेससमोर होता. त्यानंतर दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून वडेट्टीवारांचं नाव निश्चित करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2019 11:15 PM IST

ताज्या बातम्या