News18 Lokmat

सभागृहात एकमेकांवर तुटून पडणारे नेते बाहेर मात्र ‘रिलॅक्स’ !

महाराष्ट्रातल्या राजकारणाची एक खासियत सांगितली जाते. महाराष्ट्रात राजकीय विरोध टोकाचा असला तरी इथं राजकीय वैर नसतं.

News18 Lokmat | Updated On: Dec 1, 2018 10:58 AM IST

सभागृहात एकमेकांवर तुटून पडणारे नेते बाहेर मात्र ‘रिलॅक्स’ !

मुंबई, 01 डिसेंबर : गेली दोन आठवडे चाललेलं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेधन गरम राहिलं. मराठा आरक्षण, दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचनातला भ्रष्टाचार अशा मुद्यांवर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारला खिंडीत पकडण्याचा अनेकदा प्रयत्न केला.

आरक्षणाच्या प्रश्नावर तुफानी हल्लाबोल केला. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडताना सभागृहानं बघितलं. मात्र कामकाज झाल्यानंतर सभागृहातली कटुता विसरून हे सर्व नेते रिलॅक्स मुडमध्ये हास्य विनोदात रमून जातानाही दिसून आलं.

महाराष्ट्रातल्या राजकारणाची एक खासियत सांगितली जाते. महाराष्ट्रात राजकीय विरोध टोकाचा असला तरी इथं राजकीय वैर नसतं. नेते ऐकमेकांना दुष्मन समजत नाहीत. कठोर टीका करतानाही त्यात व्यक्तिगत व्देषाची किनार नसते. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाची उमदं राजकारण म्हणून देशपातळीवर ओळख आहे.

रविवारी अधिवेशन संपल्यावर विधिमंडळाच्या आवारात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विधान परिषदेतले विरोधपक्ष नेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, आमदार प्रविण दरेकर यांची गाठ पडली आणि सर्व ताण-तणाव, राग-लोभ विसरून ही नेते मंडळी हास्यविनोदात घटकाभर रमून गेली.

राजकारण आणि व्यक्तिगत संबंध यांची गल्लत करता कामा नये हे तत्व इथल्या सर्वच पक्षांतल्या ज्येष्ठ नेत्यांनी कायम पाळलं आहे. त्यामुळं उत्तरप्रदेश, बिहार या राज्यांमध्ये दिसत असलेली वैरभावना, एकमेकांच्या जीवावर उठणं महाराष्ट्रात दिसत नाही.

Loading...

बाळासाहेब ठाकरे शरद पवारांवर कठोर शब्दात टीका करत, त्यांची खिल्ली उडवत. शरद पवारही बाळासाहेबांवर त्यांच्या शैलीत टीका करायचे पण दोघांचेही व्यक्तिगत संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. शेवटपर्यंत ते कायम राहिले. मोठ्या नेत्यांचं हेच वागणं महाराष्ट्रात खालपर्यंत झिरपत आलं आहे.


...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2018 10:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...