S M L

राज्यातल्या पोलिसांचे पगार रखडले, कसं लक्ष लागणार सुरक्षेत?

दररोज 16 तास ड्युटी करणाऱ्या पोलिसांचे पगार रखडले आहेत. एप्रिल महिन्याची 12 तारीख उजाडली तरी पगार झाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आलीये.

Ajay Kautikwar | Updated On: Apr 12, 2018 08:15 PM IST

राज्यातल्या पोलिसांचे पगार रखडले, कसं लक्ष लागणार सुरक्षेत?

मुंबई,ता.12 एप्रिल : राज्याची सुरक्षाव्यवस्था राखणाऱ्या पोलीसांवर आता हतबल व्हायची वेळ आलीय. दररोज 16 तास ड्युटी करणाऱ्या पोलिसांचे पगार रखडले आहेत. एप्रिल महिन्याची 12 तारीख उजाडली तरी पगार झाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आलीये.

साधारण पणे राज्यभरातल्या पोलिसांचे पगार हे 5 तारखेपर्यंत होतात, त्यानुसार अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या कर्जाच्या किंवा एलआयसीच्या हप्त्यांचं नियोजन केलेलं असतं. मात्र एप्रिल महिन्याची 12 तारीख उजाडल्यानंतरही अजून पगार न झाल्यानं त्यांना हफ्ते भरता आले नाहीत,त्यामुळं त्यांना आता बँकांना पेनल्टी भरावी लागणार आहे.

त्यामुळे पोलिसांचं आर्थिक नियोजनच कोलमडलय. मार्च अखेरीस असणाऱ्या कामांमुळे पगार होण्यास उशीर झाला अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून मिळतेय, एकीकडे 16 तास नोकरी करत डोळ्यात तेल घालून सुरक्षा व्यवस्था सांभाळायची, त्यात मोर्चे, संप, आंदोलनं आणि नेत्यांची सुरक्षा सांभाळायची. या कामाचा येणारा ताण आणि शिस्तीचं खातं असल्याने कुणाकडे बोलायची व तक्रार करायची ही सोय नाही त्यामुळे पोलीसांवर तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ आलीय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2018 08:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close