कॅथलिक नसलेले भाडेकरू नाकारल्यानं 19 सोसायट्यांना नोटीस

कॅथलिक नसलेले भाडेकरू नाकारल्यानं 19 सोसायट्यांना नोटीस

  • Share this:

मुंबई, 25 मार्च : कॅथलिक नसलेल्या व्यक्तीला फ्लॅट्स भाड्यानं देणं किंवा खरेदी करण्यास परवानगी नाकारल्यानं मुंबई शहराजवळील तब्बल 19 सोसाट्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. वसई सब-रेजिस्ट्रारकडून नायगाव, वसई-विरार परिसरातील 19 सोसायट्यांना नोटीस बजावली गेली आहे. कॅथलिक नसलेल्या व्यक्तीला फ्लॅट्स भाड्याने देणं, घर खरेदी करू देणं तसंच सोसायटीचे सदस्य होण्यास नकार देणे याप्रकरणी संबंधित 19 कॉ.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. 'हिंदुस्थान टाईम्स'नं याबाबतचे वृत्त दिलं आहे. घटनेबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर 7 मार्चला सब-रेजिस्ट्रारकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली. रहिवासी सोसायटीतील सदस्यत्व हक्क देण्यास नकार दिल्याबाबत राजू चलमाला यांनी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. रिअल इस्टेट एजंट्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष जीतू यादव यांनी चलमाला यांना अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी मदत केली. याप्रकरणी ज्या 19 सोसायट्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, तेथे एकूण 912 फ्लॅट्स आहेत.

वाचा अन्य बातम्या

शिवसैनिकांचा गोंधळ, नेत्याचीच बैठक उधळून लावली

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हेमा मालिनींची मोठी घोषणा

25,000 रुपयांची नाणी देऊन 'या' उमेदवारानं दाखल केला अर्ज

'...तर कारवाई केली जाणार'

'सोसायटींमधले पदाधिकारी स्वतःच्या सोयीनुसार काम करत आहेत आणि इतर समुदायातील सदस्यांना फ्लॅट्स भाड्याने देणे किंवा खरेदी करण्यास परवानगी देत नाहीत. ही समस्या लवकरात-लवकर सोडवावी अन्य योग्य ती कारवाई केली जाईल', असा इशारा जारी करण्यात आलेल्या नोटीसद्वारे देण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चलमाला यांनी 2012मध्ये फ्लॅट विकत घेतला. त्यानुसार, सोसायटीचं सदस्यत्व मिळावं यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्ततादेखील त्यांनी पदाधिकाऱ्यांकडे केली. मात्र, सोसायटीच्या नोंदीमध्ये नाव नोंदवण्यास पदाधिकाऱ्यांनी नकार दिल्याचा आरोप चलमाला यांनी केला. केवळ प्रॉटेस्टण्ट ख्रिश्चन असल्याच्या कारणामुळे सदस्यत्व नाकारण्यात आल्याचीही माहिती दिली.दरम्यान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोणत्याही सोसायटीमध्ये जात, पंथ किंवा लिंगाच्या मुद्यावरुन सदस्यत्व नाकारलं जात नाही.

VIDEO : 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले', दानवेंची पुन्हा घसरली जीभ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2019 08:54 PM IST

ताज्या बातम्या