लग्नाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या, आरोपी गजाआड

लग्नाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या, आरोपी गजाआड

  • Share this:

नाशिक, 4 जून : नाशिकमधील रोशनी हिरे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिवाजी केदारेच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी शिवाजी केदारेकडून लग्नासाठी वारंवार ब्लॅकमेल केलं जात असल्याच्या त्रासाला कंटाळून रोशनीनं रविवारी (2 जून) आत्महत्या करत आयुष्य संपवलं. रोशनीनं आसाराम बापू पुलावरून गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रोशनीच्या आईनं शिवाजी केदारेविरोधात गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी शिवाजी केदारेला बेड्या ठोकल्या आहेत.

(पाहा :VIDEO: मान्सूनची प्रतीक्षा संपली, 6 जूनला मान्सून केरळच्या वेशीवर?)

38 वर्षांच्या युवकाच्या छळाला कंटाळून 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या

रोशनी हिरे या 20 वर्षीय तरुणीचा 20 जून रोजी विवाह होणार होता. मात्र आरोपी शिवाजी केदारे तिला वारंवार लग्नाची मागणी घालत ब्लॅकमेल करत होता. काही फोटोंच्या आधारे शिवाजी रोशनीला गेल्या काही महिन्यांपासून त्रास देत होता. केवळ रोशनीलाच नाही तर आरोपीकडून तिच्या आईवडिलांना जीवेमारण्याची धमकी दिली जात होती. शिवाजी केदारेचे यापूर्वीही दोन वेळा लग्न झालेलं असतानाही तो रोशनीला लग्नाची वारंवार  मागणी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

(पाहा :SPECIAL REPORT : शिवरायांबद्दल वादग्रस्त टि्वट करण्याचा पायलचा हेतू काय?)

यापूर्वी आरोपीनं रोशनीचा दोन वेळा ठरलेला विवाह मोडला आहे. तिसऱ्यांदा देखील ज्या मुलाशी रोशनीचा लग्न होणार होतं, त्या भेटून केदारेनं दोघांचं प्रेमसंबंध असल्याची खोटी बतावणी केलं. यामुळे होणारा विवाह पुन्हा मोडला. अखेरनं नैराश्यानं ग्रासलेल्या रोशनीनं मृत्युला कवटाळलं.

(पाहा :SPECIAL REPORT : गुजरातमध्ये महिलेला मारहाण करणारा भाजप आमदार आता म्हणतो...)

SPECIAL REPORT : मोदी सरकारचं पुन्हा एकदा 'मंदिर वही बनायेंगे'!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 08:38 AM IST

ताज्या बातम्या