S M L

स्वच्छ भारत अभियानाला मंत्र्याकडूनच हरताळ; राम शिंदेंची उघड्यावर लघुशंका

मंत्रीमहोदय गाडीतून बाहेर आले आणि थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जागेवर लघुशंका करू लागले. सदर प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. संबंधित व्हिडीओमध्ये त्यांचा खाजगी रक्षक विरोध करताना देखील दिसत आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 19, 2017 01:36 PM IST

स्वच्छ भारत अभियानाला मंत्र्याकडूनच हरताळ; राम शिंदेंची उघड्यावर लघुशंका

बार्शी, 19 ऑक्टोबर:  देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवणाऱ्या या सरकारचे मंत्रीच या अभियानाला केराची टोपली दाखवताना दिसत आहेत. राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी चक्क सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.त्यामुळे राज्यातील मंत्रीच जर या अभियानाला हरताळ फासत असतील तर सर्वसामान्यांच्या वर होत असलेली कारवाई किती योग्य आहे असा सवाल उपस्थित होतो आहे.

राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे हे बार्शी तालुक्याच्या दौऱ्यावर होते.जलयुक्त शिवार योजनेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या मळेगाव येथील कामाची त्यांनी पाहणी केली. गावातील पाहणी केल्यानंतर पुढच्या दौऱ्यासाठी ते निघाले. मात्र वाटेत एका ठिकाणी त्यांच्या गाडीचा ताफा थांबला, मंत्रीमहोदय गाडीतून बाहेर आले आणि थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जागेवर लघुशंका करू लागले. सदर प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. संबंधित व्हिडीओमध्ये त्यांचा खाजगी रक्षक विरोध करताना देखील दिसत आहे.

मात्र मंत्रीच असं वागत असतील तर स्वच्छ भारत अभियान मोहिमेला तडा बसत असल्याचं जाणकारांचा म्हणणं आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2017 01:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close