आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांतही 'नमो-नमो'

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांतही 'नमो-नमो'

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे जास्त चर्चेत असणाऱ्या या विदर्भाच्या जिल्ह्यांतही भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना जनतेचा कौल मिळाला आहे. या निकालाचा काय आहे अर्थ?

  • Share this:

यवतमाळ, 23 मे :  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळख असणाऱ्या विदर्भातही जनतेनं पुन्हा एकदा भाजप-युतीच्या उमेदवारांना आपला कौल दिला आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आपलं मत भाजपच्या उमेदवारांना देऊन त्यांचं पारडंच वजनदार केलं आहे. विदर्भातील दहा पैकी आठ जागांवर युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यावरून विदर्भातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारलाच आपली पसंती दर्शवल्याचं दिसत आहे.


लोकसभा निवडणूक 2014 मध्ये भाजपनं शेतकऱ्यांना भरघोस आश्वासनं देत केंद्रात बहुमतात सत्ता मिळवली होती. पण सत्तेच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारकडून निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठीच ठोस अशा उपाययोजना राबवण्यात आल्या नाहीत, मोदी सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे, असा थेट आरोप शेतकरी तसंच विरोधकांकडून करण्यात आला. परिणामी, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, कर्जमाफी यांसह आपल्या अन्य हक्कांसाठी राज्यासहीत देशभरातल्या शेतकऱ्यांनीही तीव्र स्वरूपात आंदोलनं छेडली होती.

वाचा :BREAKING LIVE Lok Sabha Election Result 2019: राहुल गांधी अमेठीतून पराभूत

त्यातच भीषण दुष्काळ, हमीभावाचा मुद्दा, अपूर्ण आश्वासनं आणि वाढती बेरोजगारी यामुळे ग्रामीण विदर्भ अनेक गंभीर प्रश्नांमध्ये अडकला आहे. दुष्काळ, नोटाबंदी, जीएसटी यांसारख्या समस्या असतानाच शेतकरी आत्महत्येचा गंभीर मुद्दादेखील होता. अशातच लोकसभा निवडणुकीत शेतकरी वर्ग भाजप-शिवसेनेला साथ देणार की नाहीत? हा प्रश्न निर्माण झाला होता.

त्यामुळे लोकसभा निवडणुकी शेतकरी राजा मतदानाद्वारे भाजपविरोधात आपला असंतोष व्यक्त करतो की काय? अशी भीती व्यक्त केली जात होती. पण शेतकऱ्यांनी 2014प्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही भाजपची साथ कायम ठेवली.

वाचा :LIVE Lok Sabha Election Result 2019: औरंगाबादमध्ये मोठा फेरबदल, इम्तियाज जलील पिछाडीवर

विदर्भातील विजयी उमेदवार

नागपूर लोकसभा मतदारसंघ - नितीन गडकरी(भाजप)

अकोला लोकसभा मतदारसंघ -  संजय धोत्रे (भाजप)

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ - अशोक नेते (भाजप)

वर्धा लोकसभा मतदारसंघ - रामदास तडस (भाजप)

भंडारा-गोंदियालोकसभा मतदारसंघ  - सुनील मेंढे (भाजप)

बुलडाणा लोकसभा मतदारसंघ - प्रतापराव जाधव (शिवसेना)

रामटेक लोकसभा मतदारसंघ - कृपाल तुमाने (शिवसेना)

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ - भावना गवळी (शिवसेना)

अमरावती लोकसभा मतदारसंघ  - नवनीत राणा (राष्ट्रवादी काँग्रेस)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ  - सुरेश धानोरकर (काँग्रेस)

VIDEO : पार्थच्या पराभवामुळे आजोबा दुखावले, अजितदादांचा उल्लेखही टाळला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 07:16 PM IST

ताज्या बातम्या