काँग्रेस आमदाराच्या पराभवासाठी काँग्रेसमधूनच लॉबिंग? ऑडियो क्लिपने खळबळ

काँग्रेस आमदार यशोमती यांना पराभूत करण्यासाठी पक्षातूनच लॉबिंग होत आहे, हे या संभाषणातून समोर आल्याचं बोललं जात आहे.

संजय शेंडे संजय शेंडे | Updated On: Apr 25, 2019 12:24 PM IST

काँग्रेस आमदाराच्या पराभवासाठी काँग्रेसमधूनच लॉबिंग? ऑडियो क्लिपने खळबळ

अमरावती, 25 एप्रिल : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र आणि काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत व भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्यामधील कथित संभाषण 'न्यूज 18 लोकमत'च्या हाती लागले आहे. यात काँग्रेस आमदार यशोमती यांना पराभूत करण्यासाठी पक्षातूनच लॉबिंग होत आहे, हे या संभाषणातून समोर आल्याचं बोललं जात आहे.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव यशोमती ठाकूर यांना काँग्रेसमधूनच अंतर्गत विरोध सुरू झाला आहे. रावसाहेब शेखावत व भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्यामधील संभाषण 'न्यूज 18 लोकमत'च्या हाती लागले. काँग्रेसमधील नेते आपल्याच पक्षातील उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजप नेत्यांसोबत चर्चा करत आहेत. या फोन रेकार्डिंगमुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

या ऑडिओ क्लिपमधील संभाषण रावसाहेब शेखावत व दिनेश सूर्यवंशी यांचे असल्याची माहिती आहे. भाजपच्या दिनेश सुर्यवनशी यांनी या क्लिपमधील आवाज आपलाच असल्याचे कबूल केलं आहे. मात्र दुसरा आवाज कुणाचा हे मात्र सांगण्यास नकार दिला.

निवडणुकीत येणाऱ्या पाच कोटी रूपयांच्या खर्चावरही फोनवर चर्चा झाली. यशोमती ह्या गेल्या 2 विधानसभा निवडणुकीपासून तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार आहेत. निवडणूक खर्चासाठी पाच कोटींची तयारी असल्याची चर्चाही फोन संभाषणादरम्यान झाली आहे. मात्र रावसाहेब शेखावत यांनी या रेकॉर्डिंग मधला आवाज आपला नाही असा दावा केला आहे.


VIDEO: NCP नगरसेविकेच्या पतीवर कुऱ्हाड, तलवारीनं सपासप वार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 12:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close