लोकसभा निवडणुकीत यशापासून आंबेडकर आणि ओवैसी 'वंचित'

लोकसभा निवडणुकीत यशापासून आंबेडकर आणि ओवैसी 'वंचित'

निवडणुकीत 'वं.ब.आ.' फॅक्टर फारसा चालला नसला तरीही यामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्यास हा फॅक्टर कारणीभूत ठरल्याचं मत तज्ज्ञांचं मांडलं आहे.

  • Share this:

अकोला, 23 मे : लोकसभा निवडणूक 2019मध्ये महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर फारसा चालला नसल्याचं पाहायला मिळालं. अॅड प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एकत्रित येत वंचित बहुजन आघाडीची स्थापन केली. या आघाडीनं सर्वच्या सर्व 48 जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. पण अपेक्षेनुसार वंचित बहुजन आघाडी राज्यात आपला करिष्मा दाखवण्यात कमी पडली. तसंच 'वं.ब.आ.'मुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त फटकादेखील बसल्याचं दिसलं. शिवाय, प्रकाश आंबेडकर स्वतःदेखील सोलापूर आणि अकोला लोकसभा मतदारसंघातून विजयी होऊ शकले नाहीत.

पाहा:VIDEO : जुनी जखम भरून निघाली, सुजय विखेंचा पवारांना सणसणीत टोला

जवळपास सर्वच जागांवर 'वं.ब.आ.'कडे मत वळली आहेत. निवडणुकीत 'वं.ब.आ.' फॅक्टर फारसा चालला नसला तरीही यामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्यास हा फॅक्टर कारणीभूत ठरल्याचं मत तज्ज्ञांचं मांडलं आहे.

पाहा:VIDEO : आमच्यासाठी राज्यघटना सर्वोच्च, विजयानंतर मोदींचं UNCUT भाषण

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला 48 जागा मिळतील, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. पण लोकसभा निवडणुकीत 'वं.ब.आ.' विजयापासून 'वंचित' राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं. प्रकाश आंबेडकर स्वतः अकोला आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण दोन्ही मतदार संघात त्यांना पराभव पत्करावा लागला.

वाचा : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना धक्का, भाजपच्या संजय धोत्रेंचा विजयी चौकार

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांनी विजयाचा चौकार लगावला आहे. तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघात एक अपवाद वगळता गेल्या 30 वर्षांपासून भाजपचं वर्चस्व आहे. यावेळीही भाजपने विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनाच उमेदवारी दिली तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही इथून निवडणूक लढवली. पण 2014च्या निवडणुकीप्रमाणे त्यांना लोकसभा निवडणूक 2019मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. पण वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र प्रचंड प्रमाणात बसल्याचं दिसत आहे.

विदर्भातील विजयी उमेदवार 

नागपूर लोकसभा मतदारसंघ - नितीन गडकरी(भाजप)

अकोला लोकसभा मतदारसंघ -  संजय धोत्रे (भाजप)

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ - अशोक नेते (भाजप)

वर्धा लोकसभा मतदारसंघ - रामदास तडस (भाजप)

भंडारा-गोंदियालोकसभा मतदारसंघ  - सुनील मेंढे (भाजप)

बुलडाणा लोकसभा मतदारसंघ - प्रतापराव जाधव (शिवसेना)

रामटेक लोकसभा मतदारसंघ - कृपाल तुमाने (शिवसेना)

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ - भावना गवळी (शिवसेना)

अमरावती लोकसभा मतदारसंघ  - नवनीत राणा (राष्ट्रवादी काँग्रेस)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ  - सुरेश धानोरकर (काँग्रेस)

VIDEO : सेनेच्या वाघाला नमवणाऱ्या नवनीत राणांची पहिली UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 11:20 PM IST

ताज्या बातम्या