ठाणे, 29 एप्रिल : शिवसेना आमदार रवींद्र फाटक मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वसई-विरारचे महापौर रुपेश जाधव यांनी रवींद्र फाटक यांची गाडी थांबवली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी या गाडीची झडती घेतली. यावेळी गाडीत दोन पाकिटांत 50 ते 60 हजार रुपये सापडले आहेत. याप्रकरणी आता गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सेन्ट्रल पार्क इथं महापौर रुपेश जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटत असल्याच्या संशयावरून आमदार फाटक यांच्या गाडीला गराडा घातला आणि गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली. यावेळी बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. मात्र पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
शिवसेनेने आचारसंहिता भंग केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी केला आहे. तसंच आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका असा इशाराही बळीराम जाधव यांनी दिला आहे.
VIDEO: मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा