'तुम्ही ती हिंमत करू नका', सुधीर मुनगंटीवारांचं थेट पवारांना आव्हान

'आमच्या घरात डोकावू नका. आम्ही तुमच्या घराकडे बघितलं तर अवघड होईल' असा इशारा शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर सभेत दिला होता.

News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2019 02:10 PM IST

'तुम्ही ती हिंमत करू नका', सुधीर मुनगंटीवारांचं थेट पवारांना आव्हान

मुंबई, 15 एप्रिल : 'शरद पवार तुम्ही लक्षात घ्या, मोदींचा परिवार संपूर्ण 125 कोटी जनता आहे. तुम्ही मोदींच्या परिवाराकडे लक्ष देण्याची हिंमत करू नका, असं थेट आव्हान भाजप नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलं आहे.

'आमच्या घरात डोकावू नका. आम्ही तुमच्या घराकडे बघितलं तर अवघड होईल' असा इशारा शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर सभेत दिला होता. त्यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी पवारांवर पलटवार केला आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?

राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड लोकसभेचे बजरंग सोनवणे यांचा प्रचारार्थ आज राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये जाहीर झाली. या सभेमध्ये शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'आमच्या घरात डोकावू नका. आम्ही तुमच्या घराकडे बघितलं तर अवघड होईल' असा इशारा पवारांनी मोदींना जाहीर सभेत दिला होता.

'मोदींना माझ्या कुटुंबाची काळजी आहे. ते म्हणतात, सगळा पक्ष पुतण्या चालवतो. पवारांची अवस्था गंभीर आहे. त्यांचं घरात कोणी ऐकत नाही. माझ्या घराची चिंता त्यांना. आम्ही सगळे एका जिवाभावाने वागतो. पण मोदीजी दुसऱ्याच्या घरात डोकावणं, हे वागणं बर नव्हं,' अशा शब्दांत शरद पवारांनी मोदींवर टीका केली.

Loading...


VIDEO : 'पुन्हा असं बोलायचं नाही', जाहीर सभेतच शरद पवारांनी दिली अमरसिंह पंडितांना वॉर्निंग


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 02:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...