सोलापूरमध्ये हायहोल्टेज लढत, शिंदेंचं पुनरागमन की आंबेडकर ठरणार जाएंट किलर?

प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना धक्का देत अकोल्यासह सोलापुरातून लढण्याचा निर्णय घेतला.

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 09:06 AM IST

सोलापूरमध्ये हायहोल्टेज लढत, शिंदेंचं पुनरागमन की आंबेडकर ठरणार जाएंट किलर?

सोलापूर, 18 एप्रिल : सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत रंगणार आहे. कारण सोलारपुरातून काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीतून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर स्वामी रिंगणात आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना धक्का देत अकोल्यासह सोलापुरातून लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे इथून कोण बाजी मारणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

काय आहे सोलापुरातील समीकरण?

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला. पण मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे शरद बनसोडे हे जाएंट किलर ठरले. आधीच भाजपचं आव्हान आणि त्यात आता प्रकाश आंबेडकर यांची एंट्री यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या मतदारसंघात मराठा, धनगर समाजाप्रमाणेच मुस्लीम आणि दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघात चांगली कामगिरी करू शकते, असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

जयसिद्धेश्वर स्वामी यांची उमेदवारी

Loading...

उमेदवाराची निवड करताना प्रत्येक पक्ष मतदारसंघातील जातीय समीकरण पाहत असल्याचं दिसून येतं. सोलापूर मतदारसंघात मराठा, मुस्लीम आणि दलित मतदारांसोबतच लिंगायत समाजाची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांची संभाव्य उमेदवारी लक्षात घेता दलित आणि मुस्लीम मतं ही भाजपकडे येण्याची शक्यता कमी आहे. तसंच सोलापूर जिल्हातील भाजपचे नेतृत्वही जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यास अनुकूल होतं. या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजाच्या मतांचं गणित लक्षात घेता भाजपने ही खेळी केल्याचं बोललं जात आहे.


VIDEO: दुसऱ्या टप्प्यातील मतदान; प्रणिती शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 09:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...