शिवसेनेत भूकंप, उद्धव ठाकरे संजय राऊतांवर नाराज

उद्धव ठाकरे हे शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर नाराज असल्याची माहिती आहे.

उदय जाधव उदय जाधव | News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 02:31 PM IST

शिवसेनेत भूकंप, उद्धव ठाकरे संजय राऊतांवर नाराज

मुंबई, 1 मे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर नाराज असल्याची माहिती आहे. बुरखाबंदीची मागणी करणाऱ्या आजच्या 'सामना'तील अग्रलेखामुळे उद्धव ठाकरे हे राऊत यांच्यावर नाराज झाले आहेत.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातील भूमिका शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं शिवसेना प्रवक्ते निलम गोऱ्हे यांनी जाहीर केलंय. बुरखाबंदी संदर्भात जो निर्णय श्रीलंका सरकारने घेतलाय, भारतातही राष्ट्रीय सुरक्षेसाठी असा निर्णय घेण्याची मागणी करणारी भूमिका सामना अग्रलेखातून मांडण्यात आली होती. मात्र सामना अग्रलेखातून मांडण्यात आलेली ही भूमिका शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं शिवसेना प्रवक्ते निलम गोर्हे यांनी स्पष्ट केलं आहे.

नीलम गोऱ्हे यांच्या स्पष्टीकरणामुळे सामनाचे संपादकीय लिखाण शिवसेना पक्षप्रमुखांचा निर्णय न घेता लिहलं जातंय का...? तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विश्वासात न घेता परस्पर अग्रलेख लिहीले जातायत का...? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

काय आहे आजचा सामनातील अग्रेलख?

- विद्यमान सरकारने ‘ट्रिपल तलाक’विरोधात कायदा करून पीडित मुस्लिम महिलांचे शोषण वगैरे थांबवले हे मान्य, पण भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे.

Loading...

- राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी जाहीर केले. आम्ही या निर्णयाचे स्वागत करीत आहोत व पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी राष्ट्रहितासाठी करीत आहोत.

- फ्रान्समध्येही दहशतवादी हल्ला होताच तेथील सरकारने बुरखा बंदी केली. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात व ब्रिटनमध्येही हेच घडले आहे. मग याबाबतीत हिंदुस्थान मागे का? एक तर असंख्य मुस्लिम तरुणींना बुरखा झुगारायचा आहेच व दुसरे म्हणजे बुरख्याआडून नेमके काय सुरू असते याचा अंदाज येत नाही.

- बुरख्यांचा वापर करून देशद्रोह, दहशतवाद घडवला जात असल्याची उदाहरणे समोर आली. मुळात बुरख्याचा इस्लामशी काडीमात्र संबंध नाही व हिंदुस्थानातील मुसलमान अरबस्तानातील समाजव्यवस्थेचे अनुकरण करीत आहेत. अरबस्तानातील वाळवंट व उन्हांच्या तप्त झळांपासून बचाव करण्यासाठी महिलांनी चेहरा झाकून बाहेर पडण्याची प्रथा कधीकाळी पडली.

- धर्म आणि समाजव्यवस्था यांची गुंतागुंत इस्लाममध्ये झाल्यामुळे सामान्य मुसलमान भांबावून जातो आणि धर्माप्रमाणे समाजव्यवस्थेचे नियम अपरिवर्तनीय नसल्यामुळे त्या नियमात बदल करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला तो आपल्या धर्मावरच घातलेला घाला वाटतो.

- उदाहरणार्थ, बहुपत्नी प्रथेला कोणी विरोध केला किंवा सक्तीच्या कुटुंबनियोजनाची भाषा केली, ट्रिपल तलाक आणि बुरखा बंदीविरोधात कोणी आवाज उठवला तर इस्लाम संकटात आल्याची बांग मारली जाते. खरे म्हणजे मुसलमानांना त्यांचाच धर्म नीट समजलेला नाही असाच त्याचा अर्थ. (अर्थात काही हिंदूंच्या बाबतीतही तेच म्हणावे लागेल.) ‘राष्ट्र नंतर, आधी धर्म’ हा मुसलमान समाजाचा प्राधान्यक्रम आहे.

- पुन्हा हा धर्मदेखील फालतू रूढी-परंपरांच्या बेड्यात अडकलेला आहे. मुसलमानांत कोणी फुले, शाहू निर्माण झाले नाहीत. किंबहुना होऊ दिले गेले नाहीत. त्यामुळे शहाबुद्दीन, आझम खान, ओवेसी बंधू व अबू आझमी या धर्मांध माथेफिरू नेत्यांचे फावले.

- ही धर्मांधता व त्यांच्यातील रूढी, परंपरा राष्ट्रीय सुरक्षेच्या आड येत असतील तर त्या मोडून काढल्या पाहिजेत. मोदी यांनी हे सर्व करून घेतले पाहिजे. सर्जिकल स्ट्राइकइतकेच हे कार्य धाडसाचे आहे.

- फेस मास्क किंवा इतर साधनांनी चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस व धैर्याचे दर्शन घडवले. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? पंतप्रधान मोदी आज अयोध्येला निघाले आहेत, म्हणूनच हा प्रश्न.


SPECIAL REPORT: दुष्काळ आणि पाणीबाणीनं होरपळणाऱ्या गावाची गोष्टबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 02:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...