बारामती जिंकण्याच्या भाजपच्या दाव्यानंतर शरद पवारांचं धक्कादायक विधान

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 09:16 AM IST

बारामती जिंकण्याच्या भाजपच्या दाव्यानंतर शरद पवारांचं धक्कादायक विधान

मुंबई, 1 मे : लोकसभा निवडणुकीसाठीचं महाराष्ट्रातील मतदान संपलं असलं तरीही राजकारण अजूनही तापलेलं आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. 'बारामतीची जागा जिंकण्याचा भाजप सातत्याने दावा करत आहे. ईव्हीएम छेडछाडीच्या आधारे तर भाजपकडून असा दावा करण्यात येत नाही ना?' अशी शंका शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपने जोरदार ताकद लावली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर बारामती शहरात अनेक दिवस तळ ठोकून होते. त्यामुळे ही जागा जिंकण्याचा दावा भाजपकडून वारंवार करण्यात येत आहे. तसंच माढ्यातून तुम्ही उभा राहू नका, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना दिला होता.

याबाबत पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'देशभरात ईव्हीएमबाबत अनेकदा शंका व्यक्त करण्यात आल्या आहेत. कधीही निवडणूक न लढवणारे चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते इतक्या आत्मविश्वासाने बारामतीची जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. हा दावा ईव्हीएमच्या जोरावर तर केला जात नाही ना?'

'...तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल'

'ईव्हीएम छेडछाड झाली तर एखादा माणूस संसदेत जाईल. पण त्यामुळे संसदीय लोकशाही प्रक्रियेवर मोठा आघात होईल. यातून लोकांचा संसदीय लोकशाहीवरील विश्वासही उडू शकतो,' असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

Loading...


SPECIAL REPORT : 'प' पवारांचा आणि 'प' पंतप्रधानांचा, हे गणित जुळणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 08:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...