Elec-widget

नगरबद्दल अखेर शरद पवारांचा खुलासा, काँग्रेसला जागा न सोडण्याचं सांगितलं कारण

नगरबद्दल अखेर शरद पवारांचा खुलासा, काँग्रेसला जागा न सोडण्याचं सांगितलं कारण

राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या भूमिकेमुळेच ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली नाही, असा आरोप करण्यात येत होता. यावर आता अखेर पवार यांनी भाष्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 4 एप्रिल : अहमदनगर लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत बराच वाद झाला. कारण ही जागा राष्ट्रवादीकडे असताना ती काँग्रेसला सोडण्यात यावी, यासाठी काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांनी बराच हट्टही केला होता. परंतु तसं करण्यास राष्ट्रवादीने नकार दिला. राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या भूमिकेमुळेच ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली नाही, असा आरोप करण्यात येत होता. यावर आता अखेर पवार यांनी भाष्य केलं आहे.

' दक्षिण नगरची जागा ही वर्षानुवर्ष राष्ट्रवादीकडे आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या तुलनेत आमची ताकदही जास्त आहे. तसंच काँग्रेसच्याही स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर हेच जाणवत होतं. पण हे कार्यकर्ते उघडपणे बोलू शकत नव्हते. कारण त्यांच्या नेत्यामुळे त्यांची अडचण होत होती. त्यामुळे तेथील परिस्थितीचा विचार करून आम्ही ही जागा आमच्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला,' असं शरद पवार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

नगरमध्ये भाजप Vs राष्ट्रवादी

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अहमदनगर मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारीही जाहीर केली आहे.

सुजय यांनी थेट भाजपचाच झेंडा हातात घेत या मतदारसंघात राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीनेही ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.

Loading...

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप यांना नगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे यांच्याविरोधात आता नगरमधून राष्ट्रवादीने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे आता नगरची लोकसभा निवडणूक मोठी रंगतदार असणार आहे.


VIDEO : सुप्रिया सुळे म्हणतात, 'मोदी आता परत आपल्याकडे येतील, त्यांना सांगायचं की...'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 09:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...