शरद पवारांचा 'राज ठाकरे' पॅटर्न, सभेत शेतकऱ्याला थेट व्यासपीठावरच बोलावलं

शरद पवारांचा 'राज ठाकरे' पॅटर्न, सभेत शेतकऱ्याला थेट व्यासपीठावरच बोलावलं

रकारची पोलखोल करताना या सभांमध्ये राज ठाकरे संबंधित व्यक्तींना थेट व्यासपीठावर बोलवतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. सरकारची पोलखोल करताना या सभांमध्ये राज ठाकरे संबंधित व्यक्तींना थेट व्यासपीठावर बोलवतात. राज ठाकरेंच्या या अनोख्या पॅटर्नला लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नाशिकच्या सभेत असंच काहीसं केलं आहे.

नाशिकच्या सभेत शरद पवार यांनी कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याला व्यासपीठावर बोलावलं. सरकारच्या धोरणांना विरोध करत कृष्णा डोंगरे यांचं अर्धनग्न आंदोलन सुरू आहे. हे सरकार बदलणार नाही तोपर्यंत शर्ट घालणार नाही, अशी भूमिका या शेतकऱ्याने घेतली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी या शेतकऱ्याला व्यासपीठावर बोलवत सरकारवर जोरदार टीका केली.

पवारांच्या सभेतील ठळक मुद्दे

- लोकांनी मोदींना संधी दिली. मात्र या 5 वर्षात त्यांनी निराशा केली

- 60 दिवस मला द्या नाहीत मला चौकात फटके मारा असं मोदींचं आश्वासन. आता मला प्रश्न आहे की त्यांना आता कोणत्या चौकात न्यायचं

- निफाडमधून द्राक्ष निर्यात सगळ्यात जास्त होते

- इंग्लंडमध्ये गोरा साहेबाला नाशिकची द्राक्ष खातांना मी पाहिलंय

- विहीर, पीक, बियाणे अशा अनेक कारणांसाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही

- मात्र या कर्जामुळे घरावर जप्ती होते

- हे सहन न झाल्यानं शेतकरी आत्महत्या

- देशात 12 कोटी शेतकऱ्यातील 30 टक्के शेतकरी कर्जबाजारी होते. म्हणून आम्ही कर्जमाफी दिली.

- आज, शेती अर्थव्यवस्था संकटात आल्यानं देशातील अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे


VIDEO: मतदानाला गालबोट, कोल्हापुरात पोलीस-शिक्षकांमध्ये तुफान हाणामारी..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 01:19 PM IST

ताज्या बातम्या