बुरखा बंदीबाबत नीलम गोऱ्हेंनी मांडलेल्या भूमिकेबद्दल संजय राऊत म्हणतात...

'नीलम गोऱ्हे या जेव्हा शिवसेनेत नव्हत्या तेव्हा त्या स्त्री चळवळीत काम करत होत्या. हे काम करताना बुरखाबंदी हा त्यांचाही विषय होता.'

News18 Lokmat | Updated On: May 6, 2019 04:49 PM IST

बुरखा बंदीबाबत नीलम गोऱ्हेंनी मांडलेल्या भूमिकेबद्दल संजय राऊत म्हणतात...

मुंबई, 6 मे : श्रीलंकेप्रमाणे भारतातही बुरखाबंदी करण्याची मागणी सामना अग्रलेखातून करण्यात आली होती. बुरखाबंदीच्या याच भूमिकेमुळे शिवसेनेतच अंतर्गत वादळ आल्याचं पाहायला मिळालं. सामना अग्रलेखातील भूमिका ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केलं होतं. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'नीलम गोऱ्हे या जेव्हा शिवसेनेत नव्हत्या तेव्हा त्या स्त्री चळवळीत काम करत होत्या. हे काम करताना बुरखाबंदी हा त्यांचाही विषय होता,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी गोऱ्हे यांना त्यांच्या आधीच्या भूमिकेची आठवण करून दिली की काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

'बुरखा बंदीचा विषय आता संपलेला आहे. जे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं ती अंतिम भूमिका आहे. प्रत्येकाला एक वैयक्तीक मत असतं. आमचं टायमिंग चूकलं असेल. सध्या त्यावर चर्चा नको,' असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेनेतील या अंतर्गत कलहावर थेट शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता भाष्य केलं आहे. 'पक्षप्रमुख जे सांगतील तो शेवटचा शब्द. मी मत मांडलं ते पक्षाचं असूच शकेल असं नाही. महाराष्ट्रात मोठी समाजिक चळवळ आहे. थोडसं त्यासंदर्भात आमचं एक पाऊल पुढे पडलं. हे पाऊल जरा जास्तंच पुढे पडलं,' अशी सारवासारव राऊत यांनी केली आहे.

'या मुद्दयावर पक्षाला अडचण आहे असं वाटलं. म्हणून मी रोखठोक मध्ये लिहिलं. बुरखा बंदी हा विषय सामाजिक चळवळीचा आहे. मला जे पटलं ते मी केलं. या भूमिकेमुळे माझ्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद आहे हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. उद्धव ठाकरे आणि माझ्यात उत्तम सुसंवाद आहे,' असं म्हणत संजय राऊत यांनी विसंवादाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

Loading...


VIDEO: स्मृती इराणी रडक्या, नवज्योत सिद्धू यांचा टोलाबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 04:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...