मतदानानंतर बदलला काकडेंचा मूड? बारामती आणि मावळबद्दल विचारताच म्हणाले...

भाजप पुरस्कृत राज्यसभा खासदार संजय काकडे यांनीही महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांबद्दल अंदाज व्यक्त केला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 14, 2019 12:53 PM IST

मतदानानंतर बदलला काकडेंचा मूड? बारामती आणि मावळबद्दल विचारताच म्हणाले...

पुणे, 14 मे : लोकसभा निवडणुकीसाठीचं महाराष्ट्रातील मतदान संपलं आहे. पण त्यानंतर अनेकांकडून या निवडणुकीच्या निकालाबाबतचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. अशातच आता भाजप पुरस्कृत राज्यसभा खासदार संजय काकडे यांनीही महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांबद्दल अंदाज व्यक्त केला आहे.

राज्यात भाजप एक नंबरचा पक्ष राहील असं संजय काकडे यांनी म्हटलं आहे. पण याआधी संजय काकडे यांना बारामती आणि मावळच्या जागेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. मावळ, बारामती यांच्या अंदाजविषयी काकडे यांना विचारलं असता त्यांनी या जागांबाबत भाष्य करणं टाळलं आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान, संजय काकडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढल्यानंतर काकडेंचा काँग्रेसप्रवेश थांबला. त्यानंतर बारामतीची जागा आम्हीच जिंकू, असा दावा संजय काकडे करत होते. मात्र आता मतदानानंतर त्यांनी थेट बारामती आणि मावळविषयी भाष्य करणं टाळलं आहे.

बारामतीत पवारांच्या गडाला भाजपचं आव्हान

बारामतीत यंदा इतिहास घडणार असून शरद पवार यांचा गड आम्ही काबीज करू, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपकडून करण्यात आला. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे मैदानात आहेत, तर भाजपकडून नवख्या कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपकडून मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सातत्याने होणाऱ्या सभा आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट बारामतीत ठोकलेला तळ, यातून पवारांचा बालेकिल्ला जिंकण्यात भाजपला यश मिळते का, हे पाहावं लागेल. बारामती मतदारसंघात 2014 च्या तुलनेत यावेळी दोन लाख 32 हजार 829 मतांची वाढ झाली आहे.

Loading...

बारामतीमध्ये गेल्या निवडणुकीत 58. 83 टक्के मतदान झालं होतं. तर यावेळी 61. 58 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. बारामती मतदारसंघात आता वाढलेली दोन लाख 32 हजार 829 मते निर्णायक ठरणार आहेत. ही वाढलेली मते नेमकी कुणाच्या बाजूने झुकतात, यावर या मतदारसंघातील विजयाचं गणित ठरू शकतं.

मावळ

मावळमधून शिवसेनेकडून पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांनाच उमेदवारी देण्यात आली. गेल्या पाच वर्षात त्यांनी आपला जनसंपर्क वाढवण्यावर विशेष भर दिला. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता होती. पण ही लढाई जिंकणं श्रीरंग बारणे यांच्यासाठी सोपी असणार नाही. कारण पार्थ पवार यांच्या रूपाने या मतदारसंघात राष्ट्रवादी तुल्यबळ उमेदवार दिला. तसंच शेकापच्या जयंत पाटील यांनीही पार्थ पवार यांच्या उमेवारीला पाठिंबा दिला. फक्त पाठिंबाच नव्हे तर पार्थ यांना उमेदवारी द्यावी, यासाठी जयंत पाटील यांनी शरद पवारांकडे गळदेखील घातली होती. त्यामुळे या मतदारसंघातून शेकाप आपली संपूर्ण ताकद राष्ट्रवादीच्या मागे लावल्याचं पाहायला मिळालं. अशावेळी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना राष्ट्रवादीने जोरदार टक्कर दिली आहे. या पार्श्वभूमीवर मावळमधील लढत चुरशीची ठरली.


VIDEO : 'जय श्रीराम' घोषणा देणं पडलं महागात, भाजप महिला नेत्याला बेदम चोपले


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2019 12:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...