Elec-widget

मोहिते पाटलांनी शब्द खरा केला आणि तिथंच बिघडलं पवारांचं गणित

मोहिते पाटलांनी शब्द खरा केला आणि तिथंच बिघडलं पवारांचं गणित

माढा हा मतदारसंघात तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण यावेळी राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद लावली होती.

  • Share this:

माढा, 24 मे : राष्ट्रवादी आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेली माढ्याची जागा जिंकण्यात अखेर भाजपला यश आलं आहे. या मतदारसंघात भाजपला मोठा विजय मिळवून देण्यात सर्वाधिक वाटा राहिला तो मोहिते पाटील कुटुंबाचा. विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी सोडली नसली तरीही या निवडणुकीत त्यांना थेट भाजपला मदत करणारी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.

माढा हा मतदारसंघात तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण यावेळी राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद लावली होती. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह यांना भाजपने पक्षात घेतलं. त्यानंतर काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षात घेत उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने संजयमामा शिंदे यांना आपल्याकडे खेचत मैदानात उतरवले. या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मोहिते पाटील घराण्याचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती.

भाजप उमेदवाराला माशशिरस तालुक्यातून एक लाख मतांपेक्षा अधिक मताधिक्य देऊ, असा शब्द या निवडणुकीदरम्यान मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. या निवडणुकीचे निकाल समोर आले तेव्हा मोहिते पाटील यांचा शब्द खरा ठरल्याचं दिसून आलं. याच तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्याच्या जोरावर भाजपने ही जागा आपल्याकडे खेचून आणली आहे.

कोणत्या तालुक्यात कुणाला किती मतदान?

करमाळा

Loading...

भाजप 71503

राष्ट्रवादी 101932

लीड राष्ट्रवादी- 30429

माढा

भाजप 98565

राष्ट्रवादी 105067

राष्ट्रवादी लीड -6502

माळशिरस

भाजप 143025

राष्ट्रवादी 42395

भाजप लीड -100630

सांगोला

भाजप 78746

राष्ट्रवादी 82120

राष्ट्रवादी लीड - 3374

फलटण

भाजप 94879

राष्ट्रवादी 93666

भाजप लीड - 1213

मान

भाजप 96476

राष्ट्रवादी 73261

भाजप लीड - 23215

एकूण

भाजप 586314

राष्ट्रवादी 500550

माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदासंघांपैकी 3 राष्ट्रवादीकडे आणि काँग्रेस, शेकाप आणि शिवसेनेकडे प्रत्येक 1 मतदारसंघ आहे. त्यामुळे माढ्याची ही जागा राष्ट्रवादीसाठी तुलनेनं सोपी मानली जाते. 2009 साली पवारांनी याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती.

मागच्या दोन निवडणुकांत काय होती स्थिती?

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल सव्वा तीन लाखांच्या फरकाने विजय मिळवला होता. तेव्हाही भाजपकडून त्यांच्याविरोधात सुभाष देशमुख हे मैदानात होते.

कुणाला किती मते मिळाली?

शरद पवार - 530,596

सुभाष देशमुख - 216,137

महादेव जानकर - 98,946

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी थेट निवडणुकीच्या मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील हे निवडणूक लढवत होते. मोदी लाटेचं मोठं आव्हान असतानाही या निवडणुकीत मोहिते पाटलांनी 'विजय' खेचून आणला होता. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी दिलेली कडवी झुंजही दुर्लक्षित करण्यासारखी नव्हती.

कुणाला किती मते मिळाली?

विजयसिंह मोहिते पाटील - 489,989

सदाभाऊ खोत - 464,645

प्रतापसिंह मोहिते पाटील - 25,187

मतदार संख्या आणि स्वरूप

या लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत मतदारांची एकूण संख्या 17 लाख 27 हजार 322 एवढी होती. यातील 10 लाख 80 हजार 167 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

पुरूष मतदारांचं प्रमाण : 52.84 टक्के

स्त्री मतदारांचं प्रमाण : 47.16 टक्के


VIDEO: मोदींच्या मंत्र्याला हरवणारा एकमेव काँग्रेसचा उमेदवार



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2019 02:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...