'नोटा' फॅक्टर ठरला गेमचेंजर, MIM ने उद्ध्वस्त केला शिवसेनेचा बालेकिल्ला

'नोटा' फॅक्टर ठरला गेमचेंजर, MIM ने उद्ध्वस्त केला शिवसेनेचा बालेकिल्ला

शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा वंचित बहुनज आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी पराभव केला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 24 मे : औरंगाबादची लोकसभेची जागा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पण यावेळी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा वंचित बहुनज आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी पराभव केला आहे. या मतदारसंघात अनेक फॅक्टर महत्त्वाचे ठरले. 'नोटा'चाही इथं मोठा परिणाम झाल्याचं आता समोर आलं आहे.

या मतदारसंघात अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हे खैरेंसाठी मोठी डोकेदुखी ठरले. जाधव हे भाजपाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. औरंगाबादमधील भाजप कार्यकर्त्यांनी जाधवांना मदत केली, असा आरोपही खैरेंकडून करण्यात आला आहे. या मतांच्या धृवीकरणाचा थेट फायदा वंचितच्या इम्तियाज जलील यांना झाला आहे. या मतदारसंघात जलील यांना मिळालेल्या मतांमधील आणि खैरेंना मिळालेल्या मतांमध्ये फार मोठं अंतर नाही. जलील हे केवळ 4 हजार 492 मतांनी विजयी झाले आहेत. तर नोटाला मिळालेल्या मतांची संख्या आहे ती 4929 इतकी. त्यामुळे इथं नोटाला मिळालेली मतं महत्त्वपूर्ण ठरली आहेत.

कुणाला किती मतं मिळाली?

1 . इम्तियाज जलील - 389042

2. चंद्रकांत खैरे - 384550

3 . हर्षवर्धन जाधव - 283798

4 . सुभाष झांबड - 91789

चंद्रकांत खैरेंसमोर मोठं आव्हान

खैरे चार वेळा खासदार झाले होते. यावेळी मात्र अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव, काँग्रेसचे सुभाष झांबड आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळेच औरंगाबादमध्ये यावेळी चौरंगी लढत रंगली होती.

मागच्या निवडणुकीत खैरेंचा विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश पाटील यांचा पराभव केला होता. चंद्रकांत खैरे यांना 5 लाख 20 हजार 902 मतं मिळाली तर सुरेश पाटील यांना 3 लाख 58 हजार 902 मतं होती.

अनेक वर्षं सेनेचं वर्चस्व

1998 ची लोकसभा निवडणूक सोडली तर शिवसेना इथे 1989 पासून 2014 पर्यंतच्या निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व राखून आहे.

मागच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजप शिवसेना युतीने काँग्रेसवर जोरदार मात केली. आताही शिवसेना - भाजपची युती असली तरी मतदार सेनेला कौल देतात का हे पाहावं लागेल.

औरंगाबादमध्ये MIM फॅक्टर

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघांत मराठा समुदायाचं वर्चस्व आहे. कन्नड, औरंगाबाद पश्चिम या विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचा ताबा आहे. औरंगाबाद विधानसभेची जागा मजलिस - ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM चा ताबा आहे. औरंगाबाद पूर्व आणि गंगापूरमध्ये भाजपचं वर्चस्व आहे.वैजापूर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा कब्जा आहे.


VIDEO : औरंगाबादचे नवे खासदार जलील यांची पहिली प्रतिक्रिया


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 03:44 PM IST

ताज्या बातम्या